मुंबई

Bhiwandi Bribe News : ग्रामविकास अधिकारी लाच स्वीकारताना एसीबीच्या जाळ्यात; ₹३०,००० रक्कम जप्त

भिवंडी : ग्रामपंचायत बोरिवली (पडसा), ता. भिवंडी, जि. ठाणे येथील ग्रामविकास अधिकारी (वर्ग-३) वित्या शंकर बनसोडे (वय ४६) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तक्रारदाराकडून ₹३०,०००/- रकमेची मागणी करून प्रत्यक्ष स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाशी संबंधित एका कामाच्या मंजुरीसाठी आरोपी अधिकाऱ्याने ₹५४,९८८/- पैकी ₹३०,०००/- लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने ही बाब ठाणे एसीबी कार्यालयात कळवली. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर दि. २५ ऑगस्ट २०२५ रोजी सापळा रचण्यात आला.

ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून लाच स्वीकारताना बनसोडे यांना दुपारी ३.४० वाजता रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्या ताब्यातून लाच म्हणून घेतलेली ₹३०,०००/- रक्कम जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणी आरोपी महिला ग्रामविकास अधिकाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय गोंत्रिलका, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही शासकीय सेवक कामासाठी लाच मागत असल्यास किंवा भ्रष्टाचाराचे प्रकार आढळल्यास त्वरित एसीबी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0