Bhayander Crime News : अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पोलीसांची कामगिरी ; दोन पीडित मुलींची सुटका
Bhayander Police Successfully Released Two victimized girls From Sex Racket : वेश्यादलालच्या ताब्यातुन दोन पिडित मुलींची सुटका करण्यास अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर पथकास यश
भाईंदर :- अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष-भाईंदर यांना बांगलादेशी वेश्यादलाल Sex Racket नामे सुलतान उर्फ मोहम्मद आलमगिर अब्दुल मोजीत मंडल व त्याचे दोन साथीदार सर्व रा. चार बंगला, वर्सोवा, अंधेरी पश्चिम असे वेश्यादलाल असुन त्यांच्याशी गिन्हाईकांना फोनद्वारे संपर्क साधला करून, ते वेश्यागमनासाठी गिन्हाईकास मुंबई, ठाणे, काशिमीरा व मिरा-भाईंदर या परिसरातील लॉजमध्ये रुम बुक करावयास लावून शॉर्ट टाईमसाठी एका मुलीचा वेश्याव्यवसाय करण्याच्या मोबदल्यात व त्यांचे कमीशन असे एकूण 15 हजार रु घेवून पुरुष गिन्हाईकास वेश्याकामासाठी मुली पुरवितात. Bhayander Crime News
अशी बातमीच्या अनुषंगाने कायदेशीर बीबींची पुर्तता करुन पोलीसांनी बोगस गिऱ्हाईक व दोन पंच बोलावुन मुख्य आरोपी वेश्यादलाल यांनी सांगितल्याप्रमाणे ठाकुर मॉलसमोर अजित पॅलेस हॉटेलच्या बाजूस असलेल्या फुटपाथवर, मुंबई-अहमदाबाद सर्व्हिसरोड, पेणकरपाडा, काशिमिरा या ठिकाणी पाठवून सत्यता पडताळून 4.45 वा. छापा टाकला असता, दोन मुख्य आरोपी वेश्यादलाल व त्यांचा साथीदार सुलतान उर्फ मोहम्मद आलमगिर अब्दुल मोजीत मंडल,( 38 वर्षे) सर्व सध्या रा.अंधेरी पश्चिम, मुळ रा. बांगलादेश यांनी आपआपसात संगणमत करुन दोन पिडीत मुलींना वेश्याकामासाठी प्रवृत्त करुन वेश्याकामाची रक्कम ठरवून स्वतःच्या उपजिवीकेकरीता रक्कम आलमगीर उर्फ सुलतान मंडल याचे मार्फतीने स्वीकारली तसेच ताब्यातील आरोपी नावे आलमगीर उर्फ सुलतान मंडल हा पासपोर्ट व्हिसा शिवाय भारतात अनाधिकृतपणे प्रवेश करुन वर्सोवा, अंधेरी परिसरात गेले 04 महिन्यापासून वास्तव्य करीत असल्याचे सांगितल्याने. त्यास सापळ्यातील मुद्देमालासह ताब्यात घेवून दोन पिडीत मुलींची सुटका केली. या बाबत सहाय्यक फौजदार रामचंद्र शिवाजी पाटील यांनी दोन पाहिजे आरोपी वेश्यादलाल व ताब्यातील वेश्यादलाल सुलतान उर्फ मोहम्मद आलमगिर अब्दुल मोजीत मंडल, (38 वर्षे) यांचेविरुध्द सरकार तर्फे फिर्याद दिल्याने काशिमिरा पोलीस ठाणे गुन्हा भा.द.वि.स कलम 370 (3), 34 सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 4,5 सह परकीय नागरीक 1948 आदेशाचे कलम 3 (अ) सह परकीय नागरीक अधिनियम 1946 चे कलम 14 (अ) प्रमाणे 16 मार्च रोजी गुन्हा दाखल आहे. Bhayander Crime News
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे)मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर अहिरराव, सहाय्यक फौजदार उमेश पाटील, रामचंद्र पाटील, पोलीस हवालदार किशोर पाटील, पोलीस शिपाई केशव शिंदे, चेतनसिंग राजपुत, पोलीस हवालदार सम्राट गावडे, महिला पोलीस हवालदार अश्विनी भिलारे, महिला पोलीस शिपाई शितल जाधव सर्व अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांनी केली आहे.