मुंबईक्राईम न्यूज

Bhayander Crime News : भाईंदर येथील मोबाईल दुकान फोडुन त्यातुन 16 लाखाहून अधिक किमतीचे मोबाईल चोरी

Bhayander Crime News गुन्हे शाखा कक्ष-1, काशिमीरा यांना यश आरोपीस 14 लाख 56 हजार 300मुद्देमालासह दिल्ली येथुन अटक

Bhayander Crime News भाईंदर येथुन चोरीस गेलेला टाटा डंपर चोरी करणाऱ्या इसमाचा शोध घेवुन चोरी गेलेला ट्रक जालना येथुन हस्तगत करण्यात यश

भाईंदर :- जे.जे. मोबाईल शॉप, 01 अप्लेश बिल्डींग, खाऊ गल्ली स्टेशन रोड, भाईंदर पश्चिम येथुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांचे दुकानाचे पश्चिम भिंतीलगत असलेले लॉखडी ग्रील व प्लाय तोडुन त्यावाटे प्रवेश करुन सुमारे 16 लाख 71 हजार 300 रुपये किंमतीचे नविन मोबाईल फोन चोरी केलेबाबत फिर्यादी चिराग जगदीश अनडा वय (36 वर्षे), मोबाईल शॉपी मालक यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून भादवीस कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. Bhayander Crime News

Bhayander Crime News

(12 मार्च) उत्तन ते भाईंदर पश्चिम येथून फिर्यादी नामे सुरेश त्रिंबक मंजुरकर (34 वर्षे) धंदा डम्पर चालक, रा घर नं. 3, गंगाधर शेठ चाळ, गायमुख घोडबंदर रोड, ता. जि. ठाणे मुळ गाव वरदरी बु. पोस्ट जवळुका ता मालेगाव यांचे मालकीचा 3 लाख रु. किंमतीची एक टाटा एस डम्पर कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करुन चोरुन नेले बाबत भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा भादवीस कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. Bhayander Crime News

वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे गुन्हे शाखा कक्ष 1 काशिमीरा मार्फत समांतर तपास करीत असताना पडताळणी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजचे आधारे तांत्रीक विश्लेषन करण्यात आले. त्यापासुन प्राप्त माहीती तसेच गुप्त बातमीदार याचे मार्फत मिळालेल्या माहितीवरुन सदरचा गुन्हा करणारा आरोपी फिरोज ऊर्फ मोनू खान रा. बांद्रा पश्चिम हा असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे बाबत तपास करता तो बिजनौर, उत्तर प्रदेश येथे गेला असल्याचे समजल्याने पोलीस पथक रवाना करण्यात आले. तपासा दरम्यान आरोपीत दिल्ली येथे गेला असल्याची माहीती मिळाली. त्याप्रमाणे दिल्ली येथे जावुन पोलीस मदत मिळवून आरोपीत नामे फिरोज ऊर्फ मोनु नईम खान (29 वर्षे) व्यवसाय बेकार मुळ रा. ग्राम अकबराबाद, तहसिल नजिबाबाद, बिजनौर, राज्य उत्तरप्रदेश यास ताब्यात घेवून गुन्ह्यातील चोरी गेलेल्या 24 मोबाईल पैकी 14 लाख 56 हजार 300 रुपये किमतीचे 22 मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. तसेच त्यांचेकडे केलेल्या चौकशी मध्ये त्याने नवघर पोलीस ठाणे गुन्हा रजी. क्रमांक भा.द.वि.स. कलम 380,457,34 प्रमाणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे. Bhayander Crime News

Bhayander Crime News

वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे ट्रक चोरीच्या गुन्हयाचे संदर्भाने तपासात सदर गुन्हयांचे घटनास्थळापासुन चोरी करणारा इसम सदर ट्रक घेवुन जात असलेल्या भाईंदर ते परभणी मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन तांत्रीक विश्लेषन करुन गुन्हयांतील गेला डंपरहिचा देवाशिष पेट्रोल पंप परभणी पर्यंत शोध घेतला. त्यानंतर सदर परिसरातील वाहन चोरीचे गुन्हे करणारे आरोपीतांची माहीती गोळा केली असता त्यातील आरोपीत नामे वैजनाथ लक्ष्मण लांडगे (67 वर्षे), रा. साईबाबा नगर, परभणी यांचा संशय आल्याने तात्रीक विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा त्यानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी वैजनाथ लक्ष्मण लांडगे याचा शोध घेतला असता त्याचा मोटार अपघात होवून तो गंभीर जखमी झाल्याने परभणी येथे हॉस्पीटल मध्ये ॲडमीट आहे. आरोपीत याने सदरचा डंपर हा चंद्रकांत गणपतराव जाधव रा. जालना यांना विक्री केलेला असुन सदरचा डंपर हा हस्तगत करण्यात आलेला आहे. Bhayander Crime News

पोलीस पथक

अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 1 काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, पुष्पराज सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक राजु तांबे, सहाय्यक फौजदार संदीप शिंदे, पोलीस हवालदार अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, सचिन हुले, सचिन सावंत, विजय गायकवाड, समिर यादव, सुधीर खोत, विकास राजपुत, पोलीस शिपाई प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी, गौरव बारी, सौरभ इंगळे, धिरज मेंगाणे,सतोष चव्हाण सायबर विभाग यांनी केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास भाईंदर पोलीस ठाणे मार्फत करण्यात येत आहे. Bhayander Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0