Bhayandar Crime News : घरफोडी करणाऱ्या घरातील भामट्यांचा भाईंदर पोलिसांनी आवळल्या मुसक्या..
•सुनेनी केली घरातच चोरी , रोख रक्कम, सोन्याचे आणि चांदीचे दागिन्यांची चोरी जवळपास 3 लाखांहून अधिक किंमतीची चोरी
भाईंदर :- 28 फेब्रुवारी 2024 रोजी चोरट्याने घरात कोण नसल्याचा संधीचा फायदा घेत चोरट्याने घरात कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील रोख रक्कम, सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने असा जवळपास 3 लाख 89 हजार किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने लंपास केल्याची तक्रार भाईंदर पोलीस ठाणे येथे नोंदवली होती. फिर्यादीच्या तक्रारीवरून 454,380 प्रमाणे भाईंदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांना सुरुवातीला हा चोरट्याने केलेल्या चोरट्याचा संशय होता. परंतु तपास अंती सुनेनेच रचला चोरीचा डाव.
मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील महेंद्र पोलीस ठाण्यात चोरीच्या घटना वाढत असताना वरिष्ठांनी यावर आळा घालण्याकरिता पोलिसांना सूचना दिल्या. वरिष्ठाच्या मदतीने पोलिसांनी घटना घडल्या त्या स्थळी सीसीटीव्ही फुटेज च्या मदतीने दिलेल्या तक्रारीवरून सदर चोरीमध्ये फिर्यादी याची सून शालू अमरजित बोथ आणि तिचा मामाचा मुलगा रजत श्यामलाल बिडलान यांनी हे कृत्य केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले.सुन शालू अमरजित बोथ हिचेकडे सखोल चौकशी करून 1 लाख 91 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल आरोपींकडून हस्तगत करण्यात भाईंदर पोलीस ठाणेस यश प्राप्त झाले आहे.
प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-01, दिपाली खन्ना, सहायक पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग, सुर्यकांत नाईकवाडी, चरिष्ठ पोलीस निरीक्षक, भाईंदर पोलीस ठाणे, विवेक सोनवणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद गोवले, पोलीस हवालदार रविंद्र भालेराव, राजेश श्रीवास्तव, किरण पी. पवार, किरण आर. पवार, सुशिल पवार, पोलीस नाईक रामनाथ शिंदे, संजय चव्हाण, सलमान पटवे यांनी चोरांचा घेतला शोध.