भांडुप : खोटे कागदपत्र सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या एजंटचा लवकरच होणार पर्दाफाश!

Bhandup Fake Documents Scam : “आमच्याकडे सर्व प्रकारचे नकली (बनावट) शासकीय कागदपत्रे तयार करून भेटतात”, भांडुप मध्ये शासनाचे कागदपत्र तयार करणाऱ्या एजंटचा (राज…..श) पराक्रम ; लवकरच नावाचा खुलासा
मुंबई :- मुंबईतील भांडुप परिसरातून अतिशय धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. Bhandup Fake Documents Scam राज्य सरकारचीच नाही तर केंद्र सरकारची ही फसवणूक करणारा प्रकार “महाराष्ट्र मिरर” वृत्तसंस्थेने समोर आणला आहे.”आमच्या इथे सर्व प्रकारचे शासकीय कागदपत्रे, तयार करून दिली जातात असे न बोलता आमच्या इथे सर्व प्रकारचे शासकीय बनावट (नकली) कागदपत्रे Bhandup Fake Document तयार करून दिले जातात अशी परिस्थिती भांडुप मध्ये पाहायला मिळत आहे. एका एजंट कडून शासनाची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जात आहे. खोटे कागदपत्र सादर करून चक्क आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, गॅजेट सर्टिफिकेट असे ऑनलाईन कागदपत्राची शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून खोटे कागदपत्र दाखल करून बनवले जात आहे. Governments Fake Documents scam
महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्थेने केलेल्या इन्वेस्टीगेशन मध्ये एजंटने तयार करण्यात आलेल्या गॅजेट सर्टिफिकेट आमच्या हाती लागले आहे. त्यामध्ये काही नावात अदलाबदली करण्यात आली आहे. तसेच या नावाची अदलाबदली करताना खोटे पुरावे ऑनलाईन सादर केल्याचे माहिती समोर आली आहे. Maharashtra Mirror Sting Operation स्टिंग ऑपरेशनमध्ये गॅजेट सर्टिफिकेट तयार करण्यात आले आहे. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
गॅजेट सर्टिफिकेट मध्ये हेराफेरी एजंटची कलाकारी
1.जुने नाव Gayatri…….. – नवीन नाव Suman………(U-7914)
2.जुने नाव Anita……नवीन नाव Madhu ………(U-7922)
3.जुने नाव Sadima…. नवीन नाव Jaibunisha ….(U-8061)
पाठपुरावा केला असता संबंधित नाव आहे. राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य राजपत्रिक यादीत नसून हे एडिट केलेले किंवा त्याच्यात छेडछाडी करून तयार केल्याचे पाहायला मिळत आहे.या एजंटला शासनाचे किंवा प्रशासनाचे “राज”अभय आहे का? सरकारी कागदपत्रे बनावट तयार करण्यासाठी शासनाची खुल्या प्रकारे होणारी फसवणूक खरंच चिंतादायक आहे.
राज्य सरकार एकीकडे बांगलादेशी हे नागरिकांना अवैध कागदपत्राच्या आधारे मोठ्या प्रमाणावर अटक करतात तर दुसरीकडे सर्रास भांडुप पोलीस ठाण्याच्या Bhandup Police Station हद्दीत खुलेआम सरकारची फसवणूक होऊन बनावट कागदपत्र कोणाच्या राजश्रायने तयार केले जातात. पोलीस प्रशासन कशाप्रकारे कारवाई करणार? अवैध कागदपत्र तयार करणाऱ्या या एजंटचा पोलिसांकडून कधी भांडाफोड होणार. तसेच, महाराष्ट्र मिरर वृत्तसंस्था लवकरच एजंटचे या कारणानामाचे फोटो आणि व्हिडिओ समोर आणणार आहे.
क्रमशः