Bhandup News : नाल्यालगतच्या घराची भिंत कोसळली; सकाळच्या वेळी हनुमान नगर हादरलं!

•भांडुपमध्ये 3 जण जखमी; 5 आणि 9 वर्षांच्या चिमुकल्यांचं सुदैवाने प्राण वाचले
मुंबई, भांडुप | भांडुप पश्चिम येथील हनुमान नगर परिसरातील पंजाबी चाळमध्ये 24 जून रोजी सकाळी 7 वाजता एक गंभीर घटना घडली. नाल्यालगत असलेल्या घराची भिंत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत एक वृद्ध महिला आणि दोन लहान मुले जखमी झाली असून, सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
तातडीने रुग्णालयात हलवले; उपचार सुरू
भिंत कोसळल्याचा आवाज ऐकताच शेजाऱ्यांनी तत्काळ मदत केली. काही क्षणांतच घटनास्थळी महापालिकेच्या अग्निशमन दलासह पोलिस आणि ‘एस विभागाचे अधिकारी पोहोचले.
जखमींची नावे पुढीलप्रमाणे:
1.वनिता विश्वास सावंत (वय 65)
2.योगेश मशीर पाल (वय 5)
3.मनीषा मशीर पाल (वय 9)
सर्व जखमींना तातडीने म. टि. अगरवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या बाह्यरुग्ण विभागात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.


