Bhandup News : तलवारीने बस, टेम्पोसह अनेक वाहनांची तोडफोड

•भांडुपमध्ये तलवारीने वाहनांची तोडफोड करणारा तरुण जेरबंद ; तोडफोडीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भांडूप पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाठलाग करून आरोपीला अटक केली.
मुंबई :- भांडूपमधील टँकरोड परिसरात शनिवारी दुपारी 3 च्या सुमारास ही घटना घडली. याच परिसरात राहणारा 17 वर्षीय मुलगा तलवार घेऊन मुख्य रस्त्यावर आला. समोरून येणाऱ्या एका बेस्टवर त्याने तलवारीने हल्ला केला आणि बसची समोरील काच फोडली.
या घटनेमुळे बसमधील प्रवाशांची एकच धावपळ उडाली. बसमधून उतरून प्रवाशांनी पळ काढला. त्यानंतर आरोपीने रस्त्यावरील एक टेम्पो, दोन रिक्षा आणि एका मोटारगाडीची काच फोडली.घटनेची माहिती मिळताच भांडूप पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाठलाग करून आरोपीला अटक केली. हा आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.अटक आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर भांडूप परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.


