Beed News : महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद गोपाल महिंद्रा यांच्या विरोधात बीड मध्ये कलम 420 प्रमाणे पोलीस तक्रार
•हतबल झालेल्या शेतकऱ्याने महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक आनंद गोपाल महिंद्रा यांच्या विरोधात बीड पोलीस ठाण्यात तक्रार
बीड :- महिंद्रा कंपनीची स्कॉर्पिओ ही चार चाकी गाडी सखाराम नामदेव शिंदे (64 वर्ष) यांनी आपल्या नर्सरीच्या व्यवसायाकरिता 31 ऑक्टोंबर 2016 16 मध्ये बीड मधील सबलोक कार शोरूम मधून खरेदी केली होती. ही कार खरेदी केल्यानंतर या कारमध्ये तांत्रिक दुरुस्ती मुळे सातत्याने गाडीतून आवाज येत होता या संदर्भातील तक्रार सबलोक कार शोरूमचे रोहित कमलनयन सबलोक यांना केली होती त्यांनी त्यांना आश्वासित केले की त्वरित तुमच्या गाडी संदर्भातील जी तक्रार आहे त्याचे निवारण होईल आणि तुम्हाला गाडी दुरुस्त करून दिली जाईल. परंतु मालकाकडून वेळोवेळी केवळ आश्वासन देऊन कोणत्याही प्रकारे त्यांच्या गाडीची निवारण झाले नाही.
15 जून 2017 रोजी कामानिमित्त माजरसुंबा घाटामधून जात असताना अचानक गाडीला आग लागली होती. पोलीस,अग्निशामक दल,कंपनीचे मालक आणि श्रीराम फायनान्स यांच्याकडे तक्रार करून शेतकऱ्यांना नवीन गाडी देण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतु शोरूमच्या मालकाने आणि फायनान्स कंपनीने अचानक हात वरती करत तुमची गाडीमध्ये तांत्रिक दुरुस्ती नसून तुमच्या ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे आग लागल्याचे सांगितले असे आहे. सबलोक कार मालकाच्या फसवणुकीमुळे शेतकऱ्याने 16 नोव्हेंबर 2017 ग्राहक निवारण म्हणजे बीड यांच्याकडे तक्रार केली होती.
या संपूर्ण प्रकरणाबाबत तक्रार दाखल करून न्यायालयाने आणि बीड उपप्रादेशिक कार्य यांच्याकडून सुद्धा अहवाल मागून गाडीच्या नुकसानीबाबत गाडीचे शोरूम सबलक जबाबदार आहे आणि त्यांनी त्वरित त्यांचे नुकसान भरपाई भरून द्यावे असे आदेश दिले होते परंतु हे आदेश दिले असूनही कोणत्याही प्रकारे न्याय मिळाला नाही त्यामुळे शिंदे यांनी थेट नेकनुर बीड पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आले असून या तक्रारीमध्ये शेतकऱ्याने थेट महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक कलम 420 प्रमाणे आनंद गोपाल महेंद्रा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. बीड मधील शोरूम चे मालक रोहित सबलोग यांचाही तक्रारीमध्ये नाव देण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व घटनेवर आनंद महिंद्रा काय कारवाई करणार किंवा शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई करणार का असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे.