महाराष्ट्रक्राईम न्यूज

Beed Crime News : पाच हजाराची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवलदाराला लाचलुचपत प्रतिबंध विभाग, यांनी केले अटक

Beed Crime News लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजी नगर यांची कारवाई ; लाचखोर हवालदाराला लाच रंगेहात पकडले

थेट मुद्यावर:पोलीस हवालदार लाच घेताना अटक

बीड :– पोलिसांच्या वर्दीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लाच स्वीकारणाऱ्या पोलीस हवालदाराला छत्रपती संभाजी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या युनिटने रंगेहात अटक केली आहे. मारुती रघुनाथ केदार (35 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस हवालदाराचे नाव असून चकलांबा पोलीस ठाणे, गेवराई बीड येथे ड्युटीवर होते.पाच हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रंगेहाथ पकडले आहे.

चंचल आणि पुन्नी:”लाच द्या किंवा मरो:भ्रष्ट हवालदाराची रंगीत पकड

तक्रारदार व त्यांचे चूलते यांच्यात शेतीच्या वादातून झालेल्या भांडणामुळे चकलांबा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी अदखल पात्र गुन्ह्यांची नोंद झाली होती, त्यामध्ये प्रतिबंधक कारवाईमध्ये मदत करण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी पंचा समक्ष पाच हजार रुपये लाचेची मागणी करून पाच हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून लागलीच 21 मे रोजी पंचासमक्ष पाच हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारली. आलोसे यांना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर,मुकुंद आघाव, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर, राजीव तळेकर, पोलिस उप अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजी नगर. यांच्या मार्गदर्शनाखाली विजयमाला चव्हाण, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. छत्रपती संभाजी नगर, अमोल धस, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि . छत्रपती संभाजी नगर या अधिकाऱ्यांनी सापळा रचून पोलीस हवालदार सिंदकर , पोलीस अंमलदार युवराज हिवाळे, अंमलदार शिंदे, लाप्रवि. छत्रपती संभाजी नगर, यांच्या युनिटने आलोसे यांचे सक्षम अधिकारी- पोलीस अधीक्षक, बीड. या संपूर्ण प्रकरणात लाचखोर पोलीस हवालदार अटक केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0