क्राईम न्यूजमहाराष्ट्र
Trending

बीड : बाल कल्याण समितीच्या भ्रष्ट सदस्य एसीबीच्या जाळ्यात!

Beed ACB Trap News : महिला बाल स्वाधार गृहातून सुटका करण्याकरिता 50 हजारांची लाच प्रकरणी बालकल्याण समितीच्या सदस्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड यांनी ताब्यात घेतले आहे

बीड :- बाल कल्याण समिती Child Welfare Society सदस्य सुरेश प्रभाकर राजहंस (40 वय, रा. शिंदे नगर कॅनल रोड बीड) यांना लाच मागितल्या प्रकरणी एसीबीने ताब्यात घेतले आहे. Beed ACB Trap लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बीड युनिटने कारवाई करत भ्रष्ट सदस्याला 50 हजार लाच प्रकरणी अटक केली आहे. बाल स्वाधार गृहातून सुटका करण्याकरिता लाच मागितली होती. Anti Corruption Bureau Latest News

एसीबीने दिलेल्या माहितीवरून,तक्रारदार यांची मैत्रीण महिला बाल स्वाधार गृहात दाखल असून तिला तक्रारदार यांनी सोडवण्या करिता 18 ऑक्टोबर रोजी अर्ज केला होता. त्यावरून मुलीला तक्रारदार यांचे ताब्यात देण्यासाठी बालकल्याण समितीचे सदस्य सुरेश राजहंस यांनी स्वतः करिता व समितीतील इतर सदस्य करिता 50 हजारांची लाच मागणी करून तडजोडांती 12 हजार रुपये घेण्याचे पंचा समक्ष मान्य करून सापळा कारवाई दरम्यान 12 हजार रुपये लाच रक्कम स्वतःघेताना सुरेश राजहंस याना बाल कल्याण समिती चे कार्यालयात लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.शिवाजी नगर पोलीस ठाणे,बीड Beed Shivaji Nagar Police Station येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे. Anti Corruption Bureau Latest News

acb sp sandeep aatole

एसीबी पथक

संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर पर्यवेक्षण अधिकारी -शंकर शिंदे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि. बीड यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी- युनूस शेख, पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.बीड सापळा पथक – पोलीस अंमलदार, भरत गारदे, अविनाश गवळी, गणेश मेहेत्रे ला. प्र. वि.बीड यांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. Anti Corruption Bureau Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0