क्राईम न्यूजमहाराष्ट्र

Beed Bribe News : बीडचा तहसीलदार आणि कोतवाल निघाला लाचखोर..

Beed Anti Corruption Bureau Bribe News : लाचलुचपत प्रतिबंध विभाग, बीड यांची कारवाई ; तहसीलदार आणि कोतवाल यांनी रेशन दुकानावर कारवाई न करण्याकरिता मागितली लाच

बीड :- केज तहसील कार्यालयातील तहसीलदार अभिजीत लक्ष्मण जगताप आणि कोतवाल मच्छिंद्र मारुती माने यांना लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड Beed Anti Corruption Bureau Department यांनी तीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना अटक केली आहे. यामध्ये रेशन दुकानादाराला कोणत्याही प्रकारची कारवाई न करायची असल्यास आम्हाला चाळीस हजार रुपये द्यावे लागेल असे सांगितण्यात आले. परंतु तोडजोडी अंत ती रक्कम 20,000 रुपये असे निश्चित करण्यात आली होती. पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संदीप आटोळे,पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव लाचलुतपत प्रतिबंधक विभाग संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली एसीबीने सापळा रचून या दोन लाचखोर अधिकाऱ्यांना अटक केली आहे. Beed Anti Corruption Bureau Bribe News

तक्रारदार यांचे रास्तभाव धान्य दुकान असुन, त्यांचे रास्त भाव धान्य दुकानामध्ये शासनाकडून मिळालेला धान्यसाठा व तक्रारदार यांनी ग्राहकांना वाटप केलेले धान्य यामध्ये तफावत असल्याचे सांगुन तक्रारदार यांचेवर कारवाई न करण्याकरीता तसेच त्यांचा रास्त भाव धान्य दुकानाचा परवाना रद्द न करण्याकरीता आरोपी तहसिलदार अभिजीत जगताप याने आरोपी मच्छिंद्र माने याचे मार्फतीने तक्रारदार यांचेकडे पंच साक्षीदारा समक्ष 40 हजार रुपये लाच मागणी करुन प्रोत्साहन दिले व आरोपी कोतवाल याने तडजोडी अंती 20 हजार रुपये स्विकारण्याचे मान्य करुन पंच साक्षीदारा समक्ष तक्रारदार यांचेकडुन 20 हजार रु लाच रक्कम स्वीकारले असता आरोपी मच्छिंद्र माने यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस ठाणे केज, जिल्हा बीड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. Beed Anti Corruption Bureau Bribe News

सापळा अधिकारी सिध्दाराम म्हेत्रे, पोलीस उप- अधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव, सापळा पथक – पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, मधुकर जाधव, सचिन शेवाळे नागेश शेरकर, चालक दत्तात्रय करडे. यांनी लाचखोर अधिकाऱ्यांना अटक केली आहे.
Web Title : “Straight to the Point: Beed Tahsildar and Kotwal Arrested for Corruption Charges”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0