Anti Corruption Bureau Beed : लाचलुचपत प्रतिबंधक बीड विभागाची कारवाई ; गुन्हा दाखल न करण्याकरिता,पोलीस हवालदाराने मागितलेली लाच
Beed Bribe News Anti Corruption Bureau Arrested Police And Government Servant : पोलीस हवालदार आणि दोन खाजगी खातेदारांच्या मदतीने 15 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले
बीड :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग Anti Corruption Bureau Beed , बीड यांनी पोलीस हवालदारासह दोन खाजगी व्यक्तींना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहेत. हरिभाऊ महादेव बांगर (48 वर्ष), पोलीस हवालदार नेमणुक पोलीस स्टेशन तलवाडा गेवराई,जि.बीड,बुद्धभुषन तुळशीराम वक्ते (29 वर्ष) (खाजगी व्यक्ती),तात्याभाऊ दिगंबर कुचेकर (36 वर्ष) (खाजगी व्यक्ती) यांना रंगेहाथ पकडले. Beed Bribe News
तक्रारदार आणि त्याचा भाऊ यांच्यात 15 एप्रिल रोजी झालेल्या भांडनातुन गुन्हा न दाखल करण्यासाठी यातील पोलीस हवालदार हरिभाऊ बांगर यांनी तक्रारदार यांना 15 हजार रुपयाची लाचमागणी करुन खाजगी व्यक्ती बुद्ध भुषन यांचेकडे लाच रक्कम देण्याचे सांगीतले . खाजगी व्यक्ती तात्याभाऊ कुचेकर यांनी लोकसेवकास लाच मिळवून देण्यासाठी प्रेत्साहन दिले यावरुन सापळा कारवाईचे व्यक्ती देवी मंदिर परीसर ,जातेगाव ता गेवराई येथे आयोजन केले असता पोलीस हवालदार हरिभाऊ बांगर यांनी तक्रारदार यांना 15 हजार रुपये लाचेची मागणी करुन लाच रक्कम खाजगी ईसम बुद्धभुषन वक्ते याचेकडे देण्याचे सांगितले . लाचरक्कम 15 हजार रुपये लोकसेवक यांचे समक्ष खाजगी व्यक्ती बुद्ध भुषन याने स्विकारताच त्यांना लाचेच्या रकमेसह रंगेहाथ पकडले व ताब्यात घेण्यात आले आहे.त्यांचे विरुद्ध पोलीस ठाणे तलवाडा गेवराई येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. Beed Bribe News
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकारी
शंकर शिंदे पोलीस उपअधिक्षक,संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद आघाव, अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, सहाय्यक सापळा आधिकारी पोलीस निरीक्षक युनुस शेख ला.प्र.वि.बीड
सापळा अधिकारी
श्रीराम गिराम , अमोल खरसाडे , अविनाश गवळी , भरत गारदे,अमोल खरसाडे,अंबादास पुरी, हनुमान गोरे , सुरेश सांगळे , संतोष राठोड , स्नेहलकुमार कोरडे ला. प्र. वि.बीड.