Beed Anti Corruption News : लाचखोर पोलीस निरीक्षक कोट्याधीश, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला पोलीस निरीक्षकाच्या घरात सापडले घबाड….
Beed Anti Corruption News : पोलीस निरीक्षकाच्या घरात एक कोटी आठ लाख रुपये रोख रक्कम, ९७० gm सोन, साडेपाच किलो चांदी आणि सहा ठिकाणी प्रॉपर्टी…..(Beed 1 Crore Bribe News)
बीड :- जिजाऊ मल्टिस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला एक कोटी रूपयांची (Beed 1 Crore Bribe News) लाच मागितली होती. त्यातील पहिला हप्ता पाच लाख रूपये खासगी इसमाच्या माध्यमातून घेण्यात आले. याप्रकरणी बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे (Beed Crime Branch ) पोलिस निरीक्षक हरिभाऊ खाडे, सहायक फौजदार जाधवर आणि खासगी इसमाविरोधात बुधवारी गुन्हा दाखल झाला होता. यातील निरीक्षक आणि एएसआय फरार आहेत.
बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने Beed Anti Corruption News गुरुवारी रात्री घर झडती घेतली असता पोलीस निरीक्षक खाडे यांच्या बीड मधील भाड्याच्या घरात रोख 01 कोटी 08 लाख रुपये, ९७० gm सोन, 5.5 किलो चांदी आणि 06 ठिकाणच्या प्रॉपर्टी चे कागदपत्रे सापडले आहेत. पोलीस उप अधीक्षक शंकर शिंदे यांनी ही माहिती दिली.
हरिभाऊ खाडे पोलिस निरीक्षक आणि सहायक फौजदार आर.बी.जाधवर असे निलंबीत केलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेटच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एका बिल्डरला खाडे यांनी 1 कोटी रूपयांची लाच मागितली होती. त्यासाठी जाधवर यांनी प्रोत्साहन दिले होते. ठरलेल्या रकमेपैकी पहिला हप्ता पाच लाख रूपये घेताना खासगी इसम कुशल जैन याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने Beed Anti Corruption News पकडले होते. त्यानंतर खाडे आणि जाधवर हे दोघेही फरार झाले होते. त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे. त्यानंतर लगेच अधीक्षक ठाकूर यांनी या दोघांनाही सेवेतून निलंबीत केले आहे.