Badlapur Tadipar News : सराईत गुन्हेगार असलेला तडीपार आरोपीला अटक
बदलापूर पूर्व पोलिसांची कामगिरी ; तडीपार असलेल्या सराईत आरोपीला अटक करून केले जेरबंद, आरोपीला चार जिल्हे आणि दोन तालुक्यांमधून दोन वर्षासाठी केले होते हद्दपार
बदलापूर :- आरोपी रुपेश उर्फ पिल्लू महादेव वावळे (24 वर्ष) या सराईत आरोपीला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि उल्हासनगर पोलीस उप आयुक्त परिमंडळ-4 यांनी आरोपीला 28 सप्टेंबर 2023 रोजी ठाणे मुंबई शहर मुंबई उपनगर रायगड या जिल्ह्यातून तसेच कर्जत व पनवेल या तालुक्यातून दोन वर्षाच्या कालावधी करिता तडीपार करण्यात आले होते.
आरोपी रुपेश याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केली असून शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता पोलिसांनी आरोपीला दोन वर्षाकरिता तडीपार केले होते. परंतु आरोपी रुपेश याने 22 मे 2024 रोजी सकाळी 11.45 मि. सुमारास बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याने अटक केली आहे. आरोपी हा शहाड फाटक उल्हासनगर-1 येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा घटक-4 उल्हासनगर यांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपीला शहाड फाटकातून अटक केली आहे. आणि त्याच्या विरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या सर्व गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस शिपाई मोरे हे करीत आहे.