“Badlapur in Danger : Robbers Strike, Police on High Alert”

बदलापूर मध्ये चोरीची घटना , चोरट्यांचा विदेशी चलनावर डल्ला
•बदलापूर पूर्व येथील एका बंगल्यात चोरी झाली असून, आरोपीने चार लाख रुपयांची परकीय चलन केले लांपास
बदलापूर :- विश्वास विष्णु पुराणिक (73 वर्ष) यांचे बदलापूर पूर्व येथील असलेल्या बंगल्यावर अज्ञात चोरट्यांकडून चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. जवळपास चार लाख किमतीचे परकीय चलन लंपास केले आहे. या घटनेनंतर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात कलम 454 प्रमाणे गुन्हा दाखल केले करण्यात आला आहे.
कशा प्रकारे चोरी झाली
20 मे 2024 रोजी चे सुमारास फिर्यादी विश्वास पुराणिक रा.बदलापुर पुर्व, यांचे बंगल्याचे सेफ्टी गेटच्या मुख्य दरवाजाचे कडी कोयंडा कोणीतरी अज्ञात चोरटयाने उचकटून त्यावाटे आत प्रवेश करून रूममधील कपाटात ठेवलेले परकिय चलन एकुण 4 लाख रुपये किमंतीचे असे घरफोडी चोरी करून नेले आहे. प्रकाराबाबत फिर्यादी महिला यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरूध्द गुन्हा भा.द.वि.कलम 454,457,380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर पी बागुल हे करीत आहे.