क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Navi Mumbai Sex Racket : वेश्याव्यवसायातून अल्पवयीन मुलीची गुन्हे शाखेकडून सुटका; आईसह विदेशी नागरिकाला अटक

Navi Mumbai Police Take Action On Sex Racket : नवी मुंबईत ‘ऑपरेशन’ करत खारघर येथील 10 वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण करणाऱ्या 70 वर्षीय व्यक्तीला बेड्या

नवी मुंबई :- नवी मुंबई पोलीस Navi Mumbai Police आयुक्तालयाच्या परिसरात अनैतिक व्यापार आणि अवैध धंद्यांवर कारवाई करण्याच्या आदेशानंतर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) एक धक्कादायक कारवाई केली आहे. वेश्याव्यवसायात ढकललेल्या एका 10 वर्षीय अल्पवयीन मुलीची गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईसह एका विदेशी (मूळ लंडन) नागरिकाला अटक करण्यात आली आहे. Navi Mumbai Latest Crime News

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना 30 ऑक्टोबर 2025 रोजी गुप्त बातमीदारांकडून खात्रीलायक माहिती मिळाली. या माहितीनुसार, खारघर परिसरातील एक महिला (मुलीची आई) तिच्या अंदाजे 10 ते 12 वर्षांच्या लहान मुलीला वेश्याव्यवसायासाठी तळोजा फेज-2 परिसरातील एका व्यक्तीकडे रात्री पाठवत असे आणि सकाळी घरी परत घेऊन येत असे. Navi Mumbai Sex racket Busted

पोलिसांनी 30 ऑक्टोबर रोजी सकाळी तळोजा फेज 02 येथील एका खोलीत कारवाई केली. यात पिडीत अल्पवयीन मुलगी अंदाजे वय 10 वर्षे, रा. खारघर हिच्यासोबत आरोपी आढळून आले. Navi Mumbai Police Latest News

अटक आरोपी (पुरुष): फारूक अल्लाउद्दीन शेख (वय40, मूळ रा. लंडन) अटक आरोपी (महिला): नूरखी अफसर अन्सारी (वय 30, मुलीची आई)

आरोपी फारूक शेख याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असूनही तिला दारू पाजून तिच्यावर मागील दोन वर्षांत अनेक वेळा जबरदस्तीने लैगिंक अत्याचार केले. याबाबत वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली होती. या कृत्यात मुलीची आई नूरखी अन्सारी हिचाही सहभाग होता. भाड्याने घर घेण्यासाठी आरोपी फारूक शेख याने दिलेले अडीच लाख रुपये आणि दरमहा रेशन या मोबदल्यात आपल्या मुलीचे शोषण होत असल्याचे माहीत असूनही तिने मुलीला त्याच्याकडे वेळोवेळी पाठवून प्रोत्साहन दिले.

या गंभीर प्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात Taloja Police Station विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना न्यायालयाने 4 नोव्हेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास तळोजा पोलीस करत आहेत.

सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पोलीस उप आयुक्त (गुन्हे), व सहाय्यक पोलीस आयुक्त, AHTU, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे, पोलीस हवालदार मांडोळे, पोलीस शिपाई ठाकुर, चव्हाण, पारासुर, पाटील, पोलीस नाईक अनिता भोये तसेच पोलीस हवालदार मोहिते यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0