क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Achole Police Station : ‘हाय-स्पीड’ जबरी चोरीचा थरार! आचोळे पोलिसांकडून ‘फायटर गँग’ जेरबंद; मुंबई-गुजरात सीमेवर 24 मोबाईल स्नॅचर्सचा डाव उधळला!

Achole Police Take Action Against Fighter Gang : ‘ऑपरेशन स्नॅच’ यशस्वी; पिस्तुलाऐवजी फायटरचा वापर करणारे सराईत चोरटे गजाआड, 3 लाख 23 हजारांचा ऐवज हस्तगत

वसई/नालासोपारा :- ‘विनायका हॉस्पीटल, आचोळे रोड’वरून रात्री-अपरात्री नागरिकांच्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या ‘हाय-स्पीड’ चोरट्यांची दहशत अखेर संपुष्टात आली आहे! गुन्हेगारी विश्वात थरार निर्माण करणाऱ्या या टोळीला आचोळे पोलिसांनी अत्यंत रोमांचक पद्धतीने अटक केली आहे. Vasai Police Latest News

फक्त मोबाईल स्नॅचिंगच नाही, तर विरोध करणाऱ्या नागरिकांच्या पोटात लोखंडी ‘फायटर’ने मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या या ‘फायटर गँग’च्या दोन सराईत सदस्यांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. Achole Police Latest News

थरारक गुन्ह्याची ‘स्टाइल’ आणि तपास

घडलेली घटना 23 ऑक्टोबर 2025 ची. रिक्षाने आठवडे बाजारात निघालेल्या फिर्यादी अमित तिवारी यांच्यावर मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी हल्ला चढवला. प्रतिकार करताच फायटरने मारून त्यांच्या हातातील ओपो मोबाईल हिसकावला आणि वाऱ्याच्या वेगाने पळून गेले.

पोलिसांसाठी हे एक मोठे आव्हान होते. चोरीच्या मोटारसायकलचा नंबर (MH 48 CL 2822) हाच पोलिसांसाठी ‘ट्रेसिंग पॉइंट’ ठरला. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांनी कौशल्यपूर्ण तपास करत, सतत जागा बदलणाऱ्या आरोपींचा पाठलाग केला. Vasai Nalasopra Police Latest News

‘ऑपरेशन स्नॅच’ यशस्वी

अखेरीस नालासोपारा पूर्वेकडील डी मार्टजवळ पोलिसांनी सापळा रचून या दोन्ही आरोपींना मोटार सायकलसह रंगेहात पकडले.

अटक आरोपींची नावे

1.सागर राजेश मिश्रा (वय 22, पेस्ट कंट्रोल)

2.सागर सुनिल वर्मा (वय 19, नोकरी)

24 मोबाईल, 3 लाखांचा ‘खजाना’ जप्त

पोलिसांनी या दोघांकडे कसून चौकशी केली असता, त्यांनी आचोळे पोलीस ठाणे हद्दीतून एकूण 24 मोबाईल खेचून जबरी चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी चोरलेले विविध कंपन्यांचे 24 मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली 1 मोटार सायकल असा एकूण 3 लाख 23 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या यशस्वी कामगिरीमुळे अनेक स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांचे हे यश उप आयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी आणि सहाय्यक आयुक्त उमेश माने-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार आणि त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने मिळवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0