Badlapur Crime News : मित्राची वाट पाहताना तरुणावर प्राणघात हल्ला..!!

•Badlapur Crime News रोहित कुठे आहे? माहित नाही… प्रश्नाच्या उत्तराचा राग मनात धरून 09 जणांकडून प्राणघातक हाल्ला..!!
बदलापूर :- रोहित कुठे आहे? मला माहित नाही, असे उत्तर मिळाल्याने हाच राग मनात धरून आरोपी यांनी सोबत आणलेल्या चाकू, चॉपर आणि तलवार ने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. यात रोहित याचा मित्र असलेला तुषार गंभीरित्या जखमी झाला आहे. पूर्व वैमनस्यातून वाद असल्याचा पोलिसांचा संशय असून जखमी ने दिलेल्या तक्रारीवरून बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 09 आरोपींनी तुषार याच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे.
तुषार वेंकटेश ढगे (21 वर्ष) हा रात्री साडेनऊ वाजले च्या सुमारास मित्र प्रसाद याची खरवई मैदान बदलापूर पूर्व येथे वाट पाहत असताना तिथे आरोपी ऋतिक माळवे, अरबाज, देवा, नागेश दांडे यांच्यासह सहा जणांनी मिळून फिर्यादी याला रोहित कुठे आहे असे विचारले असता त्यावर तुषार याच्याकडून मला माहित नाही असे बोलण्याचा राग मनात धरून त्यांनी सोबत आणलेल्या चाकू, चॉपर आणि तलवार यांनी जीवे ठार मारण्याच्या हेतूने फिर्यादी तुषार याच्या डोक्यावर हातावर वार करून त्याला गंभीरित्या जखमी केले आहे. जखमी तुषार याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बदलापूर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात भादवि कलम 307,341, 143, 144, 147, 148, 149,506 (2), तसेच भारतीय हत्यार कायदा कलम चार व पाच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1)135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी वाय जाधव हे करत आहे.