क्राईम न्यूजमुंबई

Ulhasnagar Murder News : “भांडण कशाला करता मला जायला रस्ता द्या”, ओला कारचालकावर प्राणघातक हल्ला…

Ulhasnagar Murder News Near By Vithalwadi Police Station : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, तलवार आणि डोक्यावर आणि हातावर वार, जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू

उल्हासनगर :- शुल्लक कारणावरून ओला चालकावर प्राणघातक हल्ला Attempt Murder करण्यात आल्याची घटना उल्हासनगरच्या संतोष नगर परिसरात घडली आहे. या घटनेमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या तरुणांविरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ओला कार चालक असलेले गणेश सुरेश राणे (29 वर्ष) यांनी उल्हासनगर-4 संतोष नगर येथे रस्त्यामध्ये भांडण करणाऱ्या तरुणांना भांडण कशाला करतात मला जाऊ द्या रस्ता द्या असे बोलले असता तरुणांनी हा राग मनात धरून त्यातील एक आरोपीने तलवारीने ओला कार चालकावर हल्ला केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून त्याला जीवे ठार मारण्याचा आरोपीकडून झाला आहे. या हल्ल्यात गणेश राणे यांच्या डोक्याला आणि हातावर गंभीरित्या जखमी झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहे. Ulhasnagar Murder News

29 जून च्या रात्री साडे अकराच्या सुमारास गणेश राणे हे ओला कारचे भाडे संपवून घरी परत असताना संतोष नगर उल्हासनगर-4 येथे असताना रस्त्यावर सात ते आठ मुले भांडण करत होते. गणेश राणे हे गाडीतून उतरून भांडण कशाला करतात मला जायला रस्ता द्या असे बोलले तोच राग मनात धरून त्यामधील एक आरोपी आशिष आनंद परब याने गणेशाला शिवीगाळ करून त्याच्या हातात असलेल्या तलवारीने गणेशच्या डोक्यावर आणि हातावर मारून त्याला गंभीर जखमी केले आहे. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असून गणेश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भादवी कलम 307, 504, 506 (2) भारतीय हत्यार कायदा कलम 4, 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुण्याच्या पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक विद्या लांडे हे करत आहे. Ulhasnagar Murder News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0