बाबा रामदेव यांची सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी, पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींशी संबंधित प्रकरण
Baba Ramdev, Balkrishna appear before Supreme Court today : इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. योगगुरू बाबा रामदेव यांना सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी समन्स बजावले होते.
ANI :- पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी योगगुरू बाबा रामदेव Baba Ramdev आणि पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बाळकृष्ण Balkrishna यांनी सर्वोच्च न्यायालयात Supreme Court माफी मागितली आहे. दोघांनी न्यायालयात बिनशर्त माफी मागितली आहे.नुकतेच या दोघांनाही सर्वोच्च न्यायालयाने Supreme Court या प्रकरणी समन्स बजावले होते. न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले होते की, आयुर्वेदिक कंपनी पतंजलीने सतत दिशाभूल करणाऱ्या जाहिराती प्रसिद्ध केल्याबद्दल जारी केलेल्या अवमान नोटीसला उत्तर दिलेले नाही.
27 फेब्रुवारी रोजी खंडपीठाने आचार्य बाळकृष्ण आणि पतंजली यांच्याविरुद्ध गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर दिलेल्या आश्वासनाचे उल्लंघन केल्याबद्दल अवमानाची कारवाई सुरू केली होती. न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्ला यांचाही खंडपीठात समावेश होता.
पतंजली सुप्रीम कोर्टात काय म्हणाले?
पतंजलीने यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाला आश्वासन दिले होते की ते त्यांच्या उत्पादनांच्या औषधी परिणामकारकतेचा दावा करणारे कोणतेही विधान करणार नाही किंवा कायद्याचे उल्लंघन करून त्यांची जाहिरात किंवा ब्रँड करणार नाही. कोणत्याही माध्यमात कोणत्याही औषध प्रणालीच्या विरोधात कोणतेही विधान जारी करणार नाही.
इंडियन मेडिकल असोसिएशनची काय मागणी होती?
इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकाशनाबाबत याचिका दाखल केली असून, पतंजलीवर औषध आणि जादूचे उपाय (आक्षेपार्ह जाहिराती) कायदा, 1954 चे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. योगगुरू आणि पतंजलीचे संस्थापक बाबा रामदेव यांच्याविरुद्ध कोविड-19 च्या ॲलोपॅथी उपचाराविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल अनेक राज्यांमध्ये खटले दाखल करण्यात आले आहेत.