Ashish Shelar : काँग्रेसची “अन्याय यात्रा” !… भाजप नेते आशिष शेलार यांची टीका
Ashish Shelar React On Congress : भाजपा नेते आशिष शेलार यांची काँग्रेस सह ठाकरे गडावर टीका
मुंबई :- भारतीय जनता पार्टीचे BJP नेते आमदार आशिष शेलार Ashish Shelar यांनी पुन्हा एकदा कवितेच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजपा नेत्यांवर निशाणा साधला आहे. काँग्रेसची अन्याय यात्रा असे शीर्षक देऊन भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आशिष शेलार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमावर कवितांच्या माध्यमातून विरोधकांवर सातत्याने निशाणा साधला आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांचे ट्विट
काँग्रेसची “अन्याय यात्रा” !
सांगली देता का सांगली..?
धुळ्यात ही नाराजीची ठिणगी पडली
उत्तर मुंबई का गळ्यात मारली?
मुंबईत काँग्रेस “न्याया”साठी मातोश्री समोर येऊन थांबली..!..काँग्रेसची अवस्था पाहून “न्यायपत्र” आतल्या आत रडलं…स्वतःच स्वतःची पाने फाडत चालू लागलं..मला न्याय देता का न्याय?…मला न्याय देता का न्याय?..असा टाहो फोडत…. “न्यायपत्रा” नेच काँग्रेसची “अन्याय यात्रा” काढली!