Ashish Shelar : महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर भाजप नेते आणि उमेदवार आशिष शेलार यांचे टीका
Ashish Shelar Target MVA : विकास आडवा आणि कंत्राटे जिरवा …. आशिष शेलार यांची टिका
मुंबई :- महाविकास आघाडीचा जाहीरनामा काल महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या हस्ते जाहीर करण्यात आला आहे. MVA Aghadi महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार Ashish Shelar यांनी जाहीर टीका केली आहे. आघाडीचा महाराष्ट्र डावा पाहिजे नेमके काय? विकास अडवा आणि कंत्राटे जिरवा यापेक्षा काय न्हाय असे ट्विट करत म्हणाले आहे.त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर हि टिका केली आहे.
भाजप नेते आशिष शेलार यांची ट्विट?
लाल सलाम! ….आघाडीचा “महाराष्ट्रनामा” म्हणजे नेमके काय?..विकास अडवा आणि कंत्राटे जिरवा यापेक्षा काय न्हाय…कोविड मध्ये जनतेने पाहिले यांचे कारनामे…कफनामध्ये पण हे कटकमिशन खाणारे…माझे कुटुंब माझी जबाबदारी ही यांची घोषणा…बगलबच्चांना कंत्राटे वाटणे एवढीच यांची रचना..”जय महाराष्ट्र” म्हणणारे ऐवढे बदलेत
शहरी नक्षलवाद्यांच्या झोळीत जाऊन पडलेत…”कॉम्रेड” हे उबाठा प्रमुखांचे नवे पदनाम…त्यांना आमचा लाल सलाम..! लाल सलाम !! अशी टिका शेलार यांनी केली आहे.
महाविकास आघाडी यांचा जाहिरानामा!
- महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात काही मोठ्या घोषणा करण्यात आल्या त्याबद्दल जाणून घेऊया.
- महिलांसाठी शक्ती कायद्याची अंमलबजावणी, राज्यभरात महिलांना बस प्रवास मोफत, मासिक पाळीत महिलांना दोन दिवस सुट्टी, महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 3000 रूपये देणार सुशिक्षित बेरोजगारांना महिन्याला 4000 रूपये भत्ता देणार,
- राज्य सरकारच्या अडीच लाख जागांची भरती करणार, एमपीएससीचे वेळापत्रक जाहीर करुन 45 दिवसांत निकाल
- संजय गांधी निराधार योजनेतून 2000 रुपये, शिवभोजन थाळी केंद्रांची संख्या वाढवणार, सुक्ष्म व लघू उद्योगांसाठी स्वतंत्र मंत्रालय
- 6 गॅस सिलेंडर प्रत्येक 500 रुपयांत देणार, 300 युनिट वापरणाऱ्यांचे 100 युनिटचे बील माफ करणार, शेतकऱ्यांचे 3 लाखांपर्यंतचे कर्ज माफ करणार
- सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना, सरकारी रुग्णालयात मोफत औषध उपलब्ध करणार, 25 लाखांची आरोग्य विमा योजना लागू करणार
- त्यामुळे आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांच्या जाहीरनाम्यातील कोणत्या गोष्टी मतदारांना भावणार आणि मतदार कोणाच्या पारड्यात आपले मत टाकणार हे येणाऱ्या 23 नोव्हेंबर रोजी निकालातून स्पष्ट होईल.