[ दौंड तालुक्याच्या विकासासाठी कुल यांना मोठे मताधिक्य देणार ]
दौंड, ता. ११ दौंड विधानसभा निवडणुकीत Daund Vidhan Sabha Election मिळणाऱ्या मताधिक्यापेक्षा राहुल कुल Rahul Kul यांना जास्तीचे मताधिक्य मिळेल असा विश्वास भीमा पाटस चे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी व्यक्त केला आहे. दौंड तालुक्याच्या विकासासाठी उंभ राहण्याचा निर्णय आहे. आम्ही राहुल कुल यांच्या सोबत आहोत, असं आनंद थोरात म्हणाले.
दौंड तालुक्याच्या विकासासाठी महायुतीचे उमेदवार राहुल कुल हे एक व्हिजन असलेला नेता असून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी यापुढे राहुल कुल यांच्याबरोबर ठामपणे उभा राहणार असून त्यांच्या विजयाची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेत आहे अशी माहिती भीमा पाट्स चे माजी उपाध्यक्ष आनंद थोरात यांनी दिली. यावेळी बोलताना थोरात पुढे म्हणाले की स्वर्गीय आमदार काकासाहेब थोरात आणि स्वर्गीय आमदार सुभाष अण्णा कुल यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी या विधानसभेत महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांचा विक्रमी मतांनी विजय नोंदवणे गरजेचे आहे. म्हणून मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह राहुल कुल यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. Daund Latest News
खडकवासला भुयारी मार्ग मुळशीचे पाणी यासारख्या महत्त्वकांक्षी प्रकल्पांना पूर्णत्वास नेण्यासाठी राहुल कुल यांच्यासारखे नेतृत्व गरजेचे आहे. म्हणून राहुल कुल यांना विजयी करण्यासाठी तालुक्यातील जनतेला मी आवाहन करत आहे असे देखील थोरात यावेळी म्हणाले. आनंद थोरात दौंड तालुक्यातील एक मोठे प्रस्थ असून माजी आमदार काकासाहेब थोरात यांचे पुत्र आहेत आनंद थोरात यांच्या सक्रिय सहभागामुळे राहुल कुल यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसत आहे. Daund Latest News