अवैधरित्या नवी मुंबईत तब्बल 30 वर्षापासून वास्तव्य करणाऱ्या घुसखोर बांग्लादेशी कुटुंबाला अटक

•पश्चिम बंगाल येथील खोटा जन्माचा दाखल्याचा पुरावा, नवी मुंबईत स्वतःचे घर, खोटे कागदपत्र, तब्बल तीस वर्षांपासून नवी मुंबईत वास्तव्य करत होते
नवी मुंबई :- जुहूगांव, वाशी परिसरात तब्बल तीस वर्ष स्वतःचे घर राहून घुसखोरी करून वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशीय कुटुंबाला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पोलिसांनी अटक केली आहे. पश्चिम बंगाल येथील राहत असल्याचे खोटे पुरावे दाखल करून 2024 च्या दरम्यान सुटका केली होती. परंतु पोलिसांच्या सकल चौकशीनंतर कुटुंब हे बांगलादेशी असून ते तीस वर्षांपासून भारतात वास्तव्य करत असल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी कुटुंबातील तिन्ही लोकांना अटक करून त्यांच्या विरोधात वाशी पोलीस ठाण्यात विरुद्ध पारपत्र (भारतात प्रवेश) नियम 1950 चे कलम 3 (अ) 6 (अ) सह परकीय नागरिकांचा कायदा 1946 चे कलम 14 अ सह कलम 318(4),336(2),338,336(3),340(2) कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
मिलींद भारंबे, पोलीस आयुक्त, नवी मुंबई, संजय येनपुरे, पोलीस सह आयुक्त, दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अमित काळे, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे) यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे परिसरात अवैधरित्या राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाच्या पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे यांनी कारवाई करत
24 नोव्हेंबर 2024 च्या दरम्यान बांगलादेशी कारवाई दरम्यान शरो अबताब शेख, (वय 48) त्यांची पत्नी सलमा शरो शेख,(वय 39 रा. जुहुगांव, वाशी नवी मुंबई) यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी दरम्यान त्यांनी राहत असलेल्या रूम स्वतःचे नावे असलेली कागद पत्राची झेरॉक्स तसेच पत्यावर त्यांनी बनवलेले आधार कार्ड, पॅनकार्ड, पासपोर्ट, मतदान कार्ड, शिधा पत्रिका, वाहन परवान्याच्या झेरॉक्स प्रती तसेच मुळ गावचे ग्रामीण रुग्णालय, जोयानगर, पश्चिम बंगाल येथिल मुळ जन्म प्रमाणपत्र सादर केल्यावरून त्यांना सोडुन देण्यात आले होते.
पोलिसांनी गावचे जन्मप्रमाण पत्राची पडताळणी होण्याकरीता गुन्हे शाखे मार्फत 2 फेब्रुवारी 25 रोजी अधिकारी व अंमलदार यांना पश्चिम बंगाल येथे वरिष्ठांच्या परवानगीने पाठवण्यात आले होते. दोन्ही जन्म प्रमाणपत्र हे खोटे / नकली असल्याबाबत दिनांक चिफ मेडीकल ऑफिसर ऑफ हेल्थ, साऊथ 24 परगना यांनी लेखी पत्राव्दारे कळविले.
तसेच गुप्त बातमीदार यांने वर आरोपी शेरा शेख हा ग्राम सातबढे, थाना कालिया, जि. नोडाईल, बांगलादेशचा असल्याबाबत बांगलादेशी नॅशनेलिटी कार्डचा फोटो पाठवला होता. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक सरिता गुडे यांच्या पथकाने सापळा रचून शरो अबताब शेख, (वय 48) त्यांची पत्नी सलमा शरो शेख,(वय 39 रा. जुहुगांव, वाशी नवी मुंबई) यांना अटक केली. तसेच,अब्दुलरहिम शरो शेख, (वय 22) भारतीय असला तरी पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मार्गाने 30 वर्षा पुर्वी बोनगा सीमेवरील भारत बांगलादेशाच्या गस्ती पथकाची नजर चुकवुन व स्थानिक मुलकी अधिकाऱ्यांचे पुर्व परवानगीशिवाय व कोणत्याही वैध कागदपत्राशिवाय भारतात घुसखोरी करून बेकायदेशीर रित्या वास्तव्य करत होते.