Anti Corruption Tuljapur | तुळजापूरात अंगणवाडी नियुक्ती पत्रासाठी लाच मागणारे दोघे गजाआड : लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
Anti Corruption C.Sambhajinagar divison SP Sandip Aatole
- अँटी करप्शन पोलीस अधीक्षक संदीप आटोळे यांच्या नेत्तृत्वाखाली कारवाईचा धडाका
धाराशिव, दि. १८ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर : Anti Corruption Tuljapur
तुळजापुर येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती पत्रावर वरिष्ठांची सही घेऊन ऑर्डर देण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयातील महिला कनिष्ठ सहाय्यक व अंगणवाडी सेविकेला अँटी करप्शन विभागाने रंगेहाथ पकडले आहे. धाराशिव जिल्ह्यात फोफावलेला भ्रष्टाचार संपुष्टात आणण्यासाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर पोलीस अधीक्षक संदीप आटोळे (SP Sandip Aatole) यांनी धडक मोहीम अंमलात आणली आहे. यामुळे धाराशिव जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. Anti Corruption tuljapur
याप्रकरणी आरोपी लोकसेविका श्रीमती मई बळीराम खांडेकर , वय-34 वर्षे, पद- कनिष्ठ सहाय्यक, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय,ता.तुळजापूर जि. धाराशीव.( वर्ग-०३) व सोनाली संदीप कदम , वय-28वर्षे, पद- अंगणवाडी सेविका, मौजे चिंचोली, तालुका तुळजापूर , धाराशिव. रा. चिंचोली, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव. यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
आज दि. १८ ऑक्टोबर रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग छत्रपती संभाजीनगर, धाराशिव युनिट कडून तुळजापूर येथे सापळा कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांची पत्नीचे मौजे चिंचोली, तालुका-तुळजापुर येथे अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती पत्रावर वरिष्ठांची सही घेऊन ऑर्डर देण्यासाठी पंच साक्षीदारासमक्ष तक्रारदार यांचेकडे 15,000 /- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 10,000/- रुपये लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य करुन यातील आरोपी लोकसेवक श्रीमती मई बळीराम खांडेकर यांनी पंचासमक्ष सदरची लाच रक्कम स्वतः स्विकारली असता आरोपी लोकसेवक श्रीमती मई बळीराम खांडेकर व सोनाली संदीप कदम यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाणे तुळजापूर , जिल्हा धाराशीव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
एसीबी पथक
संदीप आटोळे पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, छत्रपती संभाजीनगर मुकुंद आघाव अपर पोलीस अधीक्षक,
ला.प्र. वि, छत्रपती संभाजीनगर सापळा पर्यवेक्षण अधिकारी सिद्धाराम म्हेत्रे , पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट. यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी विकास राठोड ,पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि. धाराशिव युनिट.सापळा पथक पोलीस- अमलदार मधुकर जाधव, विशाल डोके, जाकीर काझी व चालक दत्तात्रय करडे. Anti-Corruption Department, Dharashiv