Thane Mobile Robbery News : गहाळ झालेले मोबाईल मुळ मालकांना परत; कळवा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
kalwa Police Return Stolen Mobile From Robbers : कळवा पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत हरविलेले सात लाख वीस हजार किंमतीचे 65 मोबाईल नागरिकांना परत, नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद!
ठाणे :- ठाणे पोलिसांच्या परिमंडळ 1 Thane Police Unit 1 मधील हरवलेले आणि गहाळ झालेले तब्बल सात लाख वीस हजार रुपयांचे तब्बल 65 मोबाईल नागरिकांना परत मिळून देण्यास कळवा पोलिसांना kalwa Police Station यश आले आहे. सन 2023-2024 मध्ये कळवा पोलीस ठाण्याच्या Kalwa Police Station हद्दीत विविध व्यक्ती आणि महिला यांना त्यांचे मोबाईल फोन हरवल्याचे तसेच चोरीला गेल्याच्या तक्रारी दाखल केल्या होत्या. Thane Latest Crime News
मोबाईल फोन हरवल्याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस शिपाई प्रशांत लवटे आणि इतर कर्मचाऱ्यांना सूचना देऊन मार्गदर्शन करून त्याद्वारे त्यांनी सी ई आय आर या कार्यप्रणाली द्वारे मोबाईल रेसिंगबाबतची माहिती फीडिंग करून पोलीस उपायुक्त परिमंडळ एक ठाणे यांच्या मार्फत संबंधित मोबाईल कंपनीत पाठपुरावा करून 2023-24 मध्ये मिसिंग झालेल्या मोबाईल फोन संबंधित तांत्रिक व इतर माहिती प्राप्त करून संबंधित शोध घेऊन पोलिसांनी तब्बल 65 मोबाईल फोन हस्तगत करून संबंधित व्यक्तीला परत मिळून दिले. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद व्यक्त केला आहे. मोबाईल एकदा हरवला की तो पुन्हा मिळत नाही अशी लोक भावना निर्माण झाली असताना पोलिसांच्या या कार्याबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक केले जात आहे. Thane Latest Crime News
पोलीस पथक
वरिष्ठ पोलीस निरीक्षक,अशोक उतेकर, कळवा पोलीस स्टेशन यांनी पोलीस निरीक्षक, गुन्हे, अनिल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सागर सांगवे, पोलीस हवालदार शहाजी ऐडके, राहुल पवार,श्रीमंत राठोड, गणेश बांडे, अनिल खुस्पे, पोलीस शिपाई अमोल ढावरे, नामदेव कोळी, प्रशांत लवटे यांना दिलेल्या सुचना व मार्गदर्शना प्रमाणे गुन्हयातील मिसींग झालेल्या मोबाईल फोन संबंधाने काहीएक माहिती उपलब्ध नसताना कौशल्यपुर्वकपणे तांत्रीक व इतर माहितीच्या आधारे उल्लेखनिय कामगिरी केली आहे. Thane Latest Crime News