Anti Corruption News | जप्त झालेली कार सोडविण्यासाठी लाच स्वीकारताना सहायक सरकारी वकील ताब्यात : वानवडी येथील घटनेनं खळबळ
- लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई
पुणे, दि. १४ ऑगस्ट, (मुबारक जिनेरी) महाराष्ट्र मिरर : Anti Corruption News
गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली स्विफ्ट कार सोडविण्यासाठी व मदत करण्यासाठी लाच घेणारी सहायक सरकारी अभियोक्ता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडल्याने पुण्यासह राज्यात खळबळ उडाली आहे.
लोकसेवक सहायक सरकारी अभियोक्ता अंजला नलिनी कमलाकर नवगिरे असे ताब्यात घेण्यात आलेल्या लाचखोर सरकारी वकिलाचे नाव आहे.
आज दि. १४/०८/२०२४ रोजी सहायक सरकारी अभियोक्ता यांचे कार्यालयात, लष्कर कोर्ट, वानवडी, येथे आज कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, तक्रारदार यांचे पतीचे विरुद्ध माहे जुन २०२४ मध्ये हडपसर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून, सदर गुन्ह्यात तक्रारदार यांचे नावे असलेली मारुती स्विफ्ट कार जप्त करण्यात आली होती. सदर जप्त कार परत ताब्यात मिळणेकामी तक्रारदार यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, लष्कर कोर्ट, पुणे यांचे न्यायालयात वकीलामार्फत अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने सदर अर्जाबाबत म्हणणे सादर करण्याचे आदेश सरकारी अभियोक्ता यांना दिले होते. तक्रारदार ह्यांनी लोकसेवक सहायक सरकारी अभियोक्ता अंजला नवगिरे यांची त्यांचे कार्यालयात भेट घेतली असता, लोकसेवक अंजला नवगिरे यांनी तक्रारदार यांची जप्त गाडी परत मिळवून देण्याकरीता दाखल अर्जाबाबत म्हणणे सादर करण्यासाठी व मदत करण्यासाठी तक्रारदार यांचेकडे लाच रक्कम मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी ला.प्र.वि. पुणे येथे दिली होती.
सदर तक्रारदार यांच्या तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष केली असता, लोकसेवक सहायक सरकारी अभियोक्ता अंजला नवगिरे यांनी तक्रारदार यांचेकडे हडपसर पोलीस स्टेशन येथे वरील दाखल गुन्ह्यात जप्त मारुती स्विफ्ट कार परत मिळवून देण्यासाठी व मदत करण्यासाठी पंचासमक्ष तडजोडीअंती १०,०००/- रुपयांची लाच मागणी करुन, लोकसेवक अंजला नवगिरे यांनी यांनी तक्रारदार यांचेकडून रुपये १०,०००/- लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारले असून, त्यांचेविरुद्ध वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलमान्वये गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
ला.प्र.वि. पुणे येथील पोलीस निरीक्षक रुपेश जाधव तपास करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
लोकसेवक शासकीय अधिकारी / कर्मचारी किंवा त्यांच्यावतीने खाजगी इसम (एजंट) हे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास त्याबाबत तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमूद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांनी केले आहे.
१) अॅन्टी करप्शन ब्युरो, पुणे दुरध्वनी क्रमांक ०२० २६१२२१३४, २६१३२८०२, २६०५०४२३
२) व्हॉट्स अॅप क्रमांक मुंबई ९९३०९९७७००
ई-मेलआयडी पुणे dyspacbpune@mahapolice.gov.in