लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई ; सह दुय्यम निबंधक पाच हजाराची लाच स्वीकारताना अटक
Anti Corruption Bureau News – सह दुय्यम निबंधक यांच्या घराची झडती घेतली असता एक कोटी 35 लाख रुपये रोख रक्कम सापडली
छत्रपती संभाजीनगर :- सह दुय्यम निबंधक सिल्लोड यांना पाच हजार ची लाच घेताना लाचलुचपात प्रतिबंध विभाग यांनी रंगेहाथ पकडले. सह दुय्यम निबंधक छगन उत्तमराव पाटील (49 वर्ष), आणि त्यांच्या साथीदार भीमराव किसन खरात (58 वर्ष) यांना पाच हजाराची लाच घेताना अटक केली आहे. लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सह दुय्यम निबंधक यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या घरातून एक कोटी 35 लाख रुपये रोख रक्कम लाख आला आढळून आले आहे. Anti Corruption Bureau Raid
तक्रारदार व त्यांची भावजयी यांचे सामाईक नावे असलेल्या गट क्रमांक 47/1 धावडा शिवार ता.सिल्लोड चे दस्त तक्रारदार यांची पत्नी यांच्या नावे करण्यासाठी आलोसे क्र 1 व आरोपी खाजगी इसम क्र 2 स्टॅम्प वेंडर यांनी शासकीय पंचासमक्ष 5000रुपये लाचेची मागणी करून आरोपी क्र.2 यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून लाचेची रक्कम 5000रुपये स्वतः स्वीकारली म्हणून गुन्हा आलोसे क्र 1 व 2 यांना ताब्यात घेण्यात आले असून सिल्लोड शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणेची प्रक्रिया सुरु आहे. Anti Corruption Bureau Raid
लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर,मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, राजीव तळेकर पोलीस उपाधीक्षक छत्रपती संभाजीनगर युनिट यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन साळुंखे
पोलीस निरीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, पोलीस हवालदार, साईनाथ तोडकर पो.अं.केवलसिंग गुसिंगे,युवराज हिवाळे चालक पोलीस अंमलदार बागुल ला. प्र. वि. छत्रपती संभाजीनगर यांनी यशस्वी कारवाई केली आहे.