Anti Corruption Bureau News : लाचलुचपत प्रतिबंध विभागाची कारवाई ; वरिष्ठ लिपिकाला तीन हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले
ड्युटीवर हजर राहण्याकरिता वरिष्ठ लिपिकाने पाच हजार ची मागितली होती लाच
छत्रपती संभाजी नगर :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजी नगर येथे नोकरीच असलेल्या वरिष्ठ लिपिक बंडू बाबूसिंग पवार (39 वर्ष) यांना लाचलुचपत प्रतिबंध विभाग छत्रपती संभाजी नगर तीन हजार रुपयाची लाच घेताना रंग हात पकडले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजी नगर येथे चतुर्थ श्रेणी कामगार असलेले तक्रारदार गेल्या चार महिन्यांपासून ड्युटीवर गैरहजर होते. 16 जानेवारी 2024 रोजी त्यांनी ड्युटीवर हजर होण्याकरिता अर्ज दाखल केला होता. वरिष्ठ लिपिक पवार यांनी दोन दिवसात ड्युटीवर हजर करतो याकरिता त्यांनी पाच हजार रुपयांची लाच मागितली होती परंतु तळजोडीनंतर त्यांनी तीन हजार रुपये रक्कम निश्चित केले ती स्वीकारताना आरोपी पवार यांना ताब्यात घेऊन बेगमपूर पोलीस ठाणे छत्रपती संभाजी नगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावेळी पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग छत्रपती संभाजी नगर अमोल धस यांनी पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग (Anti Corruption Bureau) संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उपाय अधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. Anti Corruption Bureau News