Amruta Fadnavis : पुण्यातील घटनेवर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘तुम्हाला लाज वाटली पाहिजे…’
Amruta Fadnavis tweet over Pune Porsche Accident and Juvenile Justice Board decision : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर अमृता फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे. कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
पुणे :- हिट अँड रन Pune Hit and Run Case प्रकरणात पहिल्या क्षणापासून पोलिसांकडून Pune Police सक्त कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी 304 चे कलम लावले होते. आरोपीला कोठडी मिळावी म्हणून पोलिसांनी बाल न्याय Juvenile Justice Board मंडळात अर्ज दाखल केला. परंतु बाल न्याय मंडळाच्या Juvenile Justice Board निर्णयाने पोलिसांसह आम्हाला देखील धक्का बसला आहे, असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. यावर आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस Amruta Fadnavis यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. ‘Shame on Juvenile Justice Board!’ असे म्हणत अमृता फडणवीस यांनी या प्रकरणी प्रतक्रिया दिली आहे. इतकेच नाही तर या प्ररकणात दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.
या प्ररकणात अमृता फडणवीस यांनी एका पोस्टच्या माध्यमातून बाल न्याय मंडळावर रोष व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, ‘अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्ठ यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना. दोषी वेदांत अग्रवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे ! बाल न्याय मंडळाला लाज वाटायला हवी’ Amruta Fadnavis tweet over Pune Porsche Accident and Juvenile Justice Board decision
आरोपींना जामीन कसा मिळाला?
पुण्यात आपल्या महागड्या कारने मोटारसायकलला धडक देणाऱ्या 17 वर्षीय मुलाला 7,500 रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि वाईट संगतीपासून दूर ठेवण्याच्या त्याच्या आजोबांनी दिलेल्या आश्वासनावर जामीन मंजूर करण्यात आला. पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी सकाळी अपघात झालेल्या पोर्श कारला 17 वर्षीय तरुण चालवत होता. पोलिसांनी अल्पवयीन युवकाबाबत दावा केला की तो दारूच्या नशेत होता.आरोपी तरुणाचे वडील रिअल इस्टेट डेव्हलपर आहेत. आरोपीला नंतर बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आणि काही वेळानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारी मध्यरात्री हा युवक सकाळी 9.30 ते 1 च्या दरम्यान मित्रांसोबत दोन हॉटेलमध्ये गेला होता आणि तेथे त्याने दारू प्राशन केली होती. बाल न्याय मंडळाने रविवारी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की,’आरोपी किशोरच्या आजोबांनी आश्वासन दिले आहे की ते मुलाला कोणत्याही वाईट संगतीपासून दूर ठेवतील आणि त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करतील किंवा त्याला त्याच्या करिअरसाठी उपयुक्त ठरेल असा कोणताही व्यावसायिक अभ्यासक्रम करायला लावतील. Amruta Fadnavis tweet over Pune Porsche Accident and Juvenile Justice Board decision