Amol Kolhe QR Code : खासदार डॉ.अमोल कोल्हे कर्तव्यपूर्तीचा अहवाल क्यू आर कोडवर
•खासदार अमोल कोल्हे यांना तीन वेळा संसद रत्न सन्मानित करण्यात आले
मुंबई :- शिरूर लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आपल्या कामाचा अहवाल एका क्यू आर कोड मध्ये संचित केला असून शिरूर लोकसभा मतदार संघातील जनतेला अमोल कोल्हे यांनी केलेल्या कामाचा आढावा घ्यायचा असेल तर एका किंवा कोडवरच संपूर्ण कामाची पुस्तिका मोबाईलवर उपलब्ध होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याच्यामध्ये फुट पडल्यानंतर शरद पवार यांची साथ देणारा खासदार अमोल कोल्हे गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या विषयाने सातत्याने चर्चेत आहे. मागील पाच वर्षात अमोल कोल्हे यांनी केलेले विकास कामाची यादी एका क्यू आर कोडवर उपलब्ध होणार आहे. Amol Kolhe QR Code
संसदेत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या खासदारांपैकी अमोल कोल्हे हे एक आहे अमोल कोल्हे यांना पाच वर्षात तीनदा संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शरद पवार यांच्या पक्षातील स्टार प्रचारक म्हणून अमोल कोल्हे यांची निवड करण्यात आली आहे. शरद पवारांची खिंड पक्षाची बाजू सातत्याने माध्यमांसोबत प्रकटपणे मांडण्याचा कामगिरी अमोल कोल्हे बजावत आहे. Amol Kolhe QR Code
खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचा लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच वर्षात केलेल्या कामाचा “कर्तव्यपूर्तीचा अहवाल”
शिरूर लोकसभा मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने किल्ले शिवनेरीच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक होत जनसेवेचे व्रत घेतले. दिलेला प्रत्येक शब्द पूर्णत्वास नेण्यासाठी “संसद ते सडक” संघर्ष केला. याची पोचपावती म्हणून मायबाप जनतेच्या वतीने पहिल्याच टर्म मध्ये सलग तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार स्वीकारण्याचं भाग्यही मला लाभलं.
या कर्तव्यपुर्तीचा अहवाल मी आपल्यासमोर मांडत आहे. हा अहवाल जरूर पाहा आणि आपला अभिप्राय नक्की कळवा ! Amol Kolhe QR Code