मुंबई
Trending

Amit Thackeray : अमित ठाकरे विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे उमेदवार देणार? संजय राऊत काय म्हणाले

Amit Thackeray Vs Shivsena राज ठाकरे यांनी आदित्य ठाकरे विरुद्ध 2019 मध्ये उमेदवार दिला नव्हता

मुंबई :- ठाकरे घराण्यातील दुसरा सदस्य आता निवडणुकीच्या रिंगणात उभा राहिला आहे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे Raj Thackeray Son यांचा पुत्र अमित ठाकरे Amit Thackeray माहीम विधानसभा Mahim Vidhan Sabha Election क्षेत्रातून विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. सध्याचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध मनसे Manse Vs Shivsena असा सामना पाहायला मिळणार असतानाच आता शिवसेना उद्धव ठाकरे ही उमेदवार देणार का? या प्रश्नावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत Sanjay Raut यांनी उत्तर दिले आहे.

2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे कुटुंबातून पहिला सदस्य हा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार होता. तसेच काकाधर्म पाळत राज ठाकरे यांनी पुतना आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध कोणताही उमेदवार दिला नव्हता. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांचा विजय झाला होता. सत्ता स्थापनेनंतर आदित्य ठाकरे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देत पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री पद दिले होते. त्यानंतर शिवसेना बंडा नंतर ठाकरे विरुद्ध शिंदे हा सामना सर्वांनीच पहिला आहे. परंतु यंदाच्या निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली आहे. त्या अनुषंगाने अमित ठाकरे यांच्याविरुद्धही उमेदवारी देणार असल्याचे खासदार संजय राऊत त्यांनी म्हणाले आहे. Maharashtra Vidhan Sabha Election Latest News

माहीम विधानसभा क्षेत्रातून शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवारी दिली यावर संजय राऊत यांना शिवसेना ठाकरे उमेदवार देणार का असे विचारले असता ते म्हणाले की, माहीम हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून शिवसेनेचे मुख्यालय म्हणजेच सेना भवन विधानसभा क्षेत्रातच आहे. तसेच, शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग या माहीम विधानसभा क्षेत्रात राहत आहे. अनेक ऐतिहासिक सभा या दादरच्या शिवाजी पार्कवर झाले आहे आणि हा शिवाजी पार्क माहीम विधानसभा क्षेत्रात येतो त्यामुळे मुळात शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या माहीम मतदारसंघात निश्चितच उमेदवार देणार असल्याचे संजय राऊत त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे काका उद्धव ठाकरे काका धर्म पाळणार का हा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे. Maharashtra Vidhan Sabha Election Latest News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0