मुंबई
Trending

Mahadev Munde Murder Case : महादेव मुंडे हत्याकांडाचा क्रूर अहवाल; 18 महिन्यांनंतरही आरोपी मोकाट, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह?

Mahadev Munde Murder Case : श्वसननलिका कापली, 16 वार, चेहरा विद्रूप… मृत्यूही थरथरला! शवविच्छेदन अहवालातील धक्कादायक माहिती

मुंबई :- बीड जिल्ह्यातील परळी शहराला 20 महिन्यांपूर्वी हादरवून सोडणाऱ्या महादेव मुंडे निर्घृण हत्याकांडाचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आला आहे. हा अहवाल वाचून अंगावर काटा येतो, कारण महादेव मुंडे यांची किती क्रूर आणि अमानुषपणे हत्या करण्यात आली होती, हे यातून स्पष्ट झाले आहे. गुन्हेगारांच्या क्रूर कृत्याने मृत्यूही थरथरला असेल, असेच म्हणावे लागेल. मात्र, या धक्कादायक घटनेला 18 महिने उलटूनही एकाही आरोपीला अटक न झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. Mahadev Munde Murder Case

शरीरावर 16 वार, जीव वाचवण्यासाठी अखेरचा संघर्ष

शवविच्छेदन अहवालानुसार, महादेव मुंडे यांच्या शरीरावर एकूण 16 वार करण्यात आले होते. त्यांची श्वसननलिका पूर्णपणे कापण्यात आली होती, तर मुख्य रक्तवाहिन्यांवरही खोलवर वार करण्यात आले होते. मानेवर, हातांवर, तोंडावर आणि शरीराच्या इतर भागांवर हे वार होते. विशेषतः, गळ्यावर केलेला एक वार तब्बल 20 सेमी लांब, 8 सेमी रुंद आणि 3 सेमी खोल होता, जो आरोपींची क्रूरता दर्शवतो. महादेव मुंडे यांचा चेहरा, छाती आणि दोन्ही हात रक्ताने माखलेले होते.

या अहवालातून हे देखील समोर आले आहे की, महादेव मुंडे यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जीव वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. प्रतिकार करताना त्यांच्या हातांना गंभीर जखमा झाल्या होत्या. डाव्या व उजव्या हाताच्या अंगठ्याजवळ, तळहातावर आणि मधल्या बोटाजवळही वार होते. खाली पडल्याने त्यांचा डावा गुडघा खरचटला होता, हे त्यांच्या अखेरच्या संघर्षाची साक्ष देते. शरीरातून अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने आणि श्वसननलिका व रक्तवाहिन्या कापल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, इतके महिने उलटूनही या हत्याकांडातील आरोपींचा शोध लागलेला नाही. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी तर थेट आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. “धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरून वाल्मीक कराडने फोन केला आणि तपास थांबवला,” असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. हा आरोप जर खरा असेल, तर या प्रकरणाच्या तपासावर आणि न्यायव्यवस्थेवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0