Ambernath Gutkha Seized News : बंदी घातलेल्या गुटख्याचा छुप्या पद्धतीने वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक
अंबरनाथ :– बंदी घातलेल्या गुटख्याची छुप्या Ambernath Gutkha Seized पद्धतीने वाहतूक करणाऱ्या दोघांना अंबरनाथ पोलीस ठाण्याचे Ambernath Police Station पोलीस पथकाने अटक केली. के. बी रोड, मटका चौक अंबरनाथ पश्चिम येथे कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून पाच लाख 39 हजार 396 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. फरहान वाहिद खान, (26 वय वर्षे, रा.उलन चाळ, अंबरनाथ पश्चिम), भुषण सुभाष हळदनकर, (30 वय , रा. बदलापुर पूर्व) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांविरुद्ध अंबरनाथ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 123,274,275,223,214 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 कलम 26(2) (i), 26(2) (iv), 27(3) (d), 27(3) (e), 30(2) (अ), 59(i) (ii) प्रमाणे तंबाखूजन्य पदार्थ उत्पादने, अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ambernath Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार के.बी.रोड,मटका चौक अंबरनाथ पश्चिम येथे मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधक गुटखा वाहतूक होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून गुटख्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातुन पाच लाख 39 हजार 396 किंमतीचा गुटखा जप्त केला आहे. केसरयुक्त विमल पान मसाला, वि-1 तंबाखू, फ्लेवर पान मसाला, रजनीगंधा पान मसाला असा राज्यात प्रतिबंध असलेला गुटख्याचा प्रकार पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास गोपाळ हे करत आहे. Ambernath Latest Crime News