
Ambernath Murder News : अंबरनाथ एमआयडीसी येथे पाच एकर जमिनीच्या वादातून प्राणघातक हल्ला, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अंबरनाथ :- एमआयडीसी अंबरनाथ Ambernath Murder पूर्व येथे पाच एकर जमिनीच्या वादातून संजय पाटील Sanjay Patil यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. गंभीर हल्ल्यात संजय श्रीराम पाटील यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात Shivaji Nagar Police Station त्यांच्याविरुद्ध 103(1),3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ambernath Police Latest Murder News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संजय श्रीराम पाटील (52 वय, रा. दुर्गादेवी पाडा) यांनी 19 वर्षांपूर्वी एमआयडीसी अंबरनाथ पूर्व येथे शांताराम पाटील यांच्याकडून पाच एकर जमीन विकत घेतली आहे. त्यानंतर शांताराम पाटील यांनी ही जमीन दुसरे लोकांना विक्री केले आहे. जमिनीच्या मालकीवरून विलास पाटील, सुरज विलास पाटील,हर्ष सुनील पाटील यांच्यात वाद चालू होता. संजय श्रीराम पाटील यांना जमिनीच्या वादातून काल (22 ऑक्टोबर) रात्रीच्या दरम्यान शिवमंदिर रोडला सुरज विलास पाटील आणि हर्श सुनील पाटील या दोघांनी संजय पाटील यांच्यावर धारदार हत्याराने पोटावर छातीवर पाठीवर वार करून त्यांना दिवे ठार मारले. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे. Ambernath Police Latest Murder News