Umesh Patil : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी दिला राजीनामा!
Ncp ajit pawar party leader spokesperson umesh patil resign : उमेश पाटील यांनी सुनील तटकरे आणि अजित पवार यांना पत्र लिहून दिला राजीनामा, पक्षशिस्त न पाळण्याचे कारण देत दिला राजीनामा
पुणे :- राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात बंडा नंतर राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे प्रवक्ते उमेश पाटील umesh patil resign यांनी अजित पवार Ncp ajit pawar यांचे साथ देत अजित पवार गटात प्रवेश केला होता. अजित पवार गटाने उमेश पाटील यांना मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी दिली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीत Vidhan Sabha Election मोहोळ विधानसभा क्षेत्रातून निवडणुका लढवण्याची तयारी करत असताना पक्षाकडून दखल न घेतल्याने आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले आहे. तसेच पक्षशिस्त ही आपण सातत्याने करणार आहोत. तसेच विद्यमान खासदार आणि उमेदवारांच्या विरोधात काम करणार असल्याचे स्पष्ट सांगण्यात त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खानदानी पाटील आहे असे पत्रात उल्लेख करत उमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
उमेश पाटील आपल्या पत्रात म्हणाले की,मोहोळ येथील जनसन्मान यात्रे निमित्त आल्या नंतर आपण (सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष) व अजित दादांनी माझ्या बाबतीत पक्ष शिस्तीच्या संदर्भाने काही विधाने केली. अर्थात तो आपला अधिकार आहे. मी सध्या पक्षाच्या मुख्य प्रवक्ता या पदावर असताना मोहोळ विधानसभेचे पक्षाचे विद्यमान आमदार यशवंत माने व माजी आमदार राजन पाटील यांच्यावर सातत्याने जाहीर टीका करत असल्याने मी पक्षाची शिस्त एकदा नव्हे तर अनेकवेळा मोडली आहे हे मला मान्य आहे. म्हणून मी विनम्रपणे पक्षाच्या मुख्य प्रवाक्ता पदाचा राजीनामा देत आहे.
मोहोळचे आमदार यशवंत माने सुप्रिया ताई सोबत गाडीत बसून गेले.. राजन पाटलांनी महायुतीचा खासदार पाडल्याबद्दल विजयसिंह मोहिते पाटलांचा घरी आणून सत्कार केला….. रामराजे नाईक निंबाळकर यांनी उघडपणे तुतरीचा प्रचार केला…. नरहरी झिरवाळ यांचा मुलगा जयंत पाटलांना भेटायला गेला…. आमदार बबनदादा शिंदे पवार साहेबांना भेटायला गेले…. राजन पाटलांनी मागच्या महिन्यात त्यांच्या मुलाच्या वाढदिसानिमित्त केलेल्या जाहिराती मध्ये अजित दादा व तुमचा फोटो न टाकता रोहित पवार व रोहित पाटील यांचे फोटो टाकले….. आमदार यशवंत माने यांनी तुतरीचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष करून विकास कामांची उद्घाटने केली…. अशी शेकडो पक्ष शिस्तीची उदाहरणे देता येतील. परंतु हे सर्व प्रस्थापित मातब्बर नेते असल्याने कदाचित थोडीफार पक्ष शिस्त मोडण्याची त्यांना सवलत असेल. सामान्य कुटुंबातील माझ्या सारख्या विस्थापित कार्यकर्त्यांना कदाचित ही सवलत नसेल, हे मी समजू शकतो.
राजकीय गरज म्हणून अजित दादांचा पुतळा जाळणाऱ्या राजन पाटील व त्यांच्या दोन्ही मुलांची बेशिस्ती आपण निर्लेखित केली. भीमा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत राजन पाटील यांनी, “आम्ही खानदानी पाटील असल्याने लग्नाच्याही आधी पोरी नासवण्याचा आम्हाला अधिकार आहे, “माझ्या मुलांनी वयाच्या 17 व्या वर्षी 302 ची कलमे भोगली असल्याने, आम्ही खानदानी गुन्हेगार व दहशतवादी असल्याचे” वक्तव्य केले होते. शिवाय त्याचा आम्हाला अभिमान असल्याचे देखील म्हटले होते. असा खानदानी पाटील आपल्या पक्षात असल्याचा, अध्यक्ष म्हणून आपल्यालाही अभिमान वाटतोय का?
आपल्या लाडक्या बहिणींना लग्नाच्या आधी नासवण्याचा उद्योग करणाऱ्या, दहशतीचे व गुंडागर्दीचे उदात्तीकरण करणाऱ्या व त्याचा अभिमान बाळगणाऱ्या राजन पाटील व त्याच्या मुलांना विरोध करणे तुमच्या राजकीय शिस्तीत बसत नसेल, परंतु छत्रपती शिवरायांच्या राज्यात अशा पाटलाला हातपाय कलम करून त्याचा चौरंग करण्याची शिक्षा दिली जात होती. कारण छत्रपती शिवराय हे प्रस्थापितांचे नव्हे तर विस्थापितांचे राजे होते. आपण शिवरायांच्या राजधानीचे खासदार असताना अशी महिलांची व माता भगिनींची विटंबना करण्याची निर्लज्ज वक्तव्य करून त्याचा अभिमान बाळगत असल्याची वक्तव्यं करणाऱ्या राजन पाटलांवर पक्ष शिस्तीची कारवाई का केली गेली नाही ?
शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार व यशवंतराव चव्हाण साहेबांचा वारसा सांगणाऱ्या पक्षात असा विकृत “खानदानी पाटील” सार्वजनिक जीवनातून हद्दपार करणे हे माझे कर्तव्य समजून मी राजन पाटलांच्या विरोधात काम करत आहे. त्यामुळे मी पक्षाच्या मूलभूत विचारधारेशी कटिबध्द आहे. पक्षाचे अध्यक्ष म्हणून तुम्ही मला साथ देण्याची अपेक्षा असताना माझ्यावरच पक्ष शिस्तीच्या संदर्भाने टिपण्णी करणे आपल्याकडून अपेक्षित नव्हते. तरीही माझे काही चुकत असल्यास जरूर माझा राजीनामा मंजूर करावा व जमल्यास क्षमा करावी ही विनंती…