मुंबई

Ambadas Danve: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समितीवर प्रश्न उपस्थित केले

Ambadas Danve On CM Eknath Shinde: शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकोट शिवरायांच्या पुतळा कोसळल्या प्रकरणी गठीत केलेल्या समितीवर प्रश्न उपस्थित केले

मुंबई :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण जवळील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात राजकीय संतप्त पाहायला मिळाला आहे. शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर निषेध व्यक्त केला आहे. या सर्व घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे CM Eknath Shinde यांनी एक समिती तयार करून ही घटना का घडली या प्रकरणावर संपूर्ण पाहणी करून भविष्यात यापेक्षाही मोठा पुतळा उभा करण्याची जबाबदारी सरकारने घेतली आहे. या समितीवरच राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केले आहे. अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांनी गठीत केलेल्या समितीतील तज्ञांनी कधी मातीचा गणपती जरी बनवलाय का असा प्रश्न उपस्थित केला आहे.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काय म्हणाले?

आम्ही राजकोट किल्ल्यावर गेलो म्हणून मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या प्रकरणात एक समिती नेमली. हा विषय महाराष्ट्राच्या आत्म्याशी जोडलेला असल्याने काही विषय मांडतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांप्रती आत्मीयता बाळगून असतील तर यावर उत्तर देतील..

1.वास्तूविशारद आणि शिल्पकार या दोन भिन्न गोष्टी आहेत. ज्या लोकांचे नाव या समितीमध्ये घेतले आहे, त्या लोकांनी कधी साधा मातीचा गणपती तरी हाताने बनवला आहे का? ते पडलेल्या शिल्पाचा अभ्यास करण्यास पात्र आहेत का?

2.किती उंचीचा पुतळा येथे उभारायचा, याचा शास्त्रीय अभ्यास झाला होता का? खालील बेटाची ताकद जोखून हा पडलेला पुतळा उभा झाला होता का? की कोणाची तरी राजकीय महत्वाकांक्षा म्हणून मनाने उंचीचा आकडा सांगितला गेला?

3.राजकोटवर आजघडीला उपलब्ध बांधकाम सामुग्री वापरून उभारण्यात आलेली लाल भडक तटबंदी किल्ल्याच्या मूळ अवशेषांचे वाटोळे करून उभारली गेली का?

4.विद्यमान सदस्यांच्या प्रेमापोटी काही विद्वान माणसे मुद्दाम बाजूला ठेवण्यात आली आहेत का?

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0