Ambadas Danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी कमी…
Ambadas Danve : Ambadas Danve यांची पाच दिवसाचे निलंबन कारवाई आता तीन दिवसांवर उद्यापासून सभागृहात राहणार हजर
मुंबई :- राज्याचे विधान परिषदेचे (Vidhan Parishad) विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांना सभागृहामध्ये शिवीगाळ केल्याप्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पाच दिवसासाठी निलंबित केले होते. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपसभापती यांना दिलगिरी व्यक्त करणारी पत्र लिहून पुन्हा निलंबनाबाबत फेरविचार करावा अशी मागणी केली होती. त्यावर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ठराव मंजूर करून निलंबनाची कारवाई पाच ऐवजी तीन दिवसाचे करण्यात आली या ठरावाला सर्वांनी एक मताने मंजूर केले आहे.भाजप आमदार प्रसाद लाड यांना अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली होती. या प्रकरणानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राची माफी मागितली होती तर अंबादास दानवे यांनीही उपसभापतींकडे दिलगिरी व्यक्त करण्यात आली होती.
राहुल गांधी यांच्या लोकसभेतील हिंदूविरोधी वक्तव्यावरून सोमवारी विधान परिषदेच्या सभागृहात वाद झाला होता. त्यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती. त्यामुळे त्यांना पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतरही ते शिवीगाळीवर ठाम होते. एवढेच नव्हे तर सभागृहाबाहेर लाड यांना ‘प्रसाद’ देऊ, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, मंगळवारी दुपारी उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला. दानवेंच्या वक्तव्यावर माता-बहिणींची माफी मागतो, असे ते म्हणाले. त्यानंतर 18 तासांनी दानवेंनी सभागृहाची दिलगिरी व्यक्त करणारे पत्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्ह यांना पाठवले होते. त्यात निलंबनाचा फेरविचार करावा, निलंबन रद्द करावे, अशी मागणी त्यांनी केली होती.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
निलंबनाचा कालावधी कमी करण्यात आल्यानंतर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. निलंबन मागे घेण्यास त्यांनी उशीर केला असल्याचे दानवे यांनी म्हटले आहे. त्यांनी खूप काही वेगळे केले असे नाही, तरी त्यांनी दिवस घेतले आहेत. उद्यापासून मी सभागृहात जाणार असून आक्रमकतेने विरोधी पक्षाची भूमिका मांडणार असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे.