Ambadas Danve : विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे विधान भवनात, निलंबनानंतर अंबादास दानवे सभागृहात बोलणार
•विरोधी पक्षनेते Ambadas Danve यांच्या निलंबन कालावधी कमी केल्यानंतर आज विधान परिषदेत अंबादास दानवे भूमिका मांडणार
मुंबई :- शिवसेना ठाकरे गटाचे नेते विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केल्याप्रकरणी त्यांना पाच दिवसाचा कालावधीसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर अंबादास दानवे आज विधिमंडळात उपस्थित राहिले प्रसार माध्यमाचे संवाद साधताना ते म्हणाले की,माझ्यावर एकतर्फी कारवाई झाली. आता तीन दिवसांची कसर भरून काढणार असे म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. अंबादास दानवे आजपासून सभागृहात उपस्थित आहेत. गुरुवारी त्यांच्या निलंबनाचा कालावधी तीन दिवसांचा करण्यात आला. त्यांनी उपसभापतींना दिलगिरीचे पत्र दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. ते आजपासून सभागृहात उपस्थित असून अधिवेशनाच्या आधी विरोधकांच्या आंदोलनात ते सहभागी झाले होते.
विरोधी पक्षनेत्या शिवाय सभागृह चालवणे चूक अधिवेशनाच्या आधी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी निलंबनाच्या कारवाईबाबत त्यांनी भाष्य केले आहे. “माझ्यावर एकतर्फी कारवाई झाली होती. विरोधी पक्षनेत्या शिवाय सभागृह चालवणे ही चूक आहे. सभागृह चालवणे ही उपसभापती, सत्ताधारी, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री आणि इतर सर्वांची जबाबदारी असते. मात्र केवळ मला एकट्याला जबाबदार धरले गेले. या तीन दिवसांची कसर भरून काढत सरकारला धारेवर धरणार” असे दानवे म्हणाले.