Actress Shweta Shinde : सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्वेता शिंदेच्या घरी झालेल्या चोरीचा शोध, साडेतेरा लाखांचे दागिने जप्त..
सातारा पोलिसांची कामगिरी ; चोरीचा शोध लावण्यात पोलिसांना यश
सातारा :- मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्री श्वेता शिंदेच्या Shweta Shinde साताऱ्यातील घरी झालेल्या चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्यास सातारा पोलिसांना यश आले. पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला असून या चोरट्याकडून तीन गुन्हे उघड केले आहे. 18 तोळे वजनाचे सोन्याचांदीचे दागिने जप्त केले असून त्याची किंमत 13 लाख 31 हजारांचे एवढी आहे.अभिनेत्रीच्या घरी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना तपास करण्याचे आदेश दिले होते.
अभिनेत्रीच्या कपाटातील सोन्याच्या दागिने लंपास, एकाच वेळी तीन ठिकाणी केले चोरी
अभिनेत्रीच्या घरातील खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटामध्ये ठेवलेले सुमारे 3 लाख 82 हजारांचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असलेला राजकुमार उर्फ राजु ओंकारप्पा आपचे ( कोथळी ता. उमरगा, धाराशिव) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने सातारा, भुईंज, लोणंद हे तीन घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितल्याने त्याच्याकडून 13 लाख 31 हजारांचे दागिने व दुचाकी जप्त केली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, रोहित फार्णे व उपनिरीक्षक अमित पाटील यांनी व अंमलदार यांनी ही कारवाई केली.