मुंबई
Trending

Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली 16 लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक

 Mumbai North-East Loksabha: लोकसभेच्या 10 जागेचा तिढा सुटण्याची शक्यता, ईशान्य मुंबई लोकसभा भेटण्याची शक्यता

मुंबई :- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार Ajit Pawar यांच्या नेतृत्वाखाली 16 लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक मुंबईत पार पाडले. या बैठकीत दहा जागेच्या तिढा सुटण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई यांच्यावतीने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी अग्रेसर असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातील ईशान्य मुंबई, पुणे बारामती सांगली जुन्नर आंबेगाव नगर भागातील लोकसभा मतदारसंघात ओबीसी मतदार मोठ्या संख्येने असल्याने या सर्व मतदारसंघांवर ओबीसी समाजाचे चांगले प्राबल्य आहे. मानखुर शिवाजीनगर भागात मुस्लिम समाज आणि बौद्ध समाज यांचे प्राबल्य जास्त असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार Ajit Pawar यांना मानणारा वर्ग आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईत जागा मिळावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई अग्रेसर आहे.

2009 च्या लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संजय दिना पाटील हे खासदार म्हणून निवडून गेले होते या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चांगलेच ताकद आहे विशेष म्हणजे अजित पवार यांच्या कामावर जनतेचा फार मोठा विश्वास आहे. त्यामुळे या लोकसभा मतदार संघात म्हणजे ईशान्य मुंबईत अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करिता राखीव करावा अशी मागणी मुंबई कार्याध्यक्ष शिवाजीराव नलावडे, जिल्हाध्यक्ष सुरेश भालेराव,महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी भास्कर विचारे,विलास माने,मुंबई पदाधिकारी राजू घुगे,मुंबई ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने ,यांनी या बैठकीला उपस्थित राहुल मुंबईमध्ये असलेल्या सहा लोकसभा मतदारसंघांपैकी ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला राखीव करावी असा आग्रह धरण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0