lok Sabha Election 2024: अजित पवार यांना धक्का बसण्याची शक्यता? अजित पवार यांचा शिलेदार राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता
Nashik lok Sabha Election 2024 : खासदार सुजय विखे पाटील यांना पुन्हा लोकसभेच्या उमेदवारी जाहीर, निलेश लंके होते इच्छुक
नाशिक :- लोकसभा निवडणुकीसाठी lok sabha election भाजपकडून बुधवारी सायंकाळी महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीरकरण्यात आली. यात अहमदनगरदक्षिण मतदारसंघातून डॉ. सुजय विखे यांनी उमेदवारी मिळवण्यात बाजी मारली. यानिमित्ताने विखे कुटुंबीयांचेदिल्लीतील वजन पुन्हा एकदा सिद्ध झाले. पण डॉ. सुजय यांना उमेदवारी देण्यावरून पक्षातंर्गत होत असलेल्या नाराजी नाट्यावरपडदा पडला.
आता सर्व नाराजी विसरुन पक्षाने दिलेल्या उमेदवाराचे काम करावे लागणार आहे. पण या लढाईतपक्षातील दिग्गजांना सोबत घेऊन काम करण्याचे आव्हान डॉ. विखे यांच्यासमोर असेल. दरम्यान, उमेदवारी जाहीरहोताच आमदार निलेश लंके यांच्या गटात हालचालींनावेग आला. आ. लंके शरद पवार गटात जाणार की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे Ajit Pawar आमदार नीलेश लंके MLA Nilesh Lanke हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा मागील दोन तीन दिवसांपासून सुरु असतानाच, आता नीलेश लंके आजच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज दुपारी चार वाजता हा पक्षप्रवेश होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. दरम्यान नीलेश लंके यांना लोकसभा निवडणूक लढवयाची आहे. काही दिवसांपूर्वी खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना शरद पवार गटाकडून लोकसभेची ऑफर दिली होती. त्यानंतर नीलेश लंके राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली होती. परंतु नीलेश लंके यांनी नकार दिला होता. आता शरद पवार यांच्या उपस्थित त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे. नीलेश लंके यांचे ‘मी अनुभवलेले कोव्हीड’ या पुस्तकाचे प्रकाशन आज होणार आहे. हे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.