Ajit Pawar Group: रोहित पवार यांच्या टीकेला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर ; रोहित पवार बाल मित्र मंडळाचे अध्यक्ष…
Ajit Pawar Group Target Rohit Pawar : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर रोहित पवार यांनी अजित पवार गटावर साधला होता निशाणा, अजित पवार गटाकडून रोहित पवार यांच्यावर टीका
मुंबई :- निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर Lok Sabha Election राज्याच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गट Ajit Pawar Group यांच्यात टीका टीकाटिपण्णी केली जात आहे. अजित पवार गटाचे नेते, आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार Rohit Pawar यांच्यावर जोरदार टीका केली आहे. माझी लायकी बालमित्र मंडळाचे अध्यक्ष रोहित पवार हे काढत आहेत. मी शेतकऱ्यांच्या पोरगा आहे, ही माझी लायकी आहे. तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आला आहात. तुमची पक्षात काय लायकी आहे ते बघा, असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केला आहे.
अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांची टीका
तुम्ही आता पक्षात अजित पवार Ajit Pawar बनण्याचा प्रयत्न करत आहात, ते कधीही होणार नाही. तुम्हाला माझं आव्हान आहे की, तुमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून पुढील तीन दिवसात पक्षाची जबाबदारी दिली आहे, अस एक पत्र घेऊन यावं. जयंत पाटील त्यांच्या संघर्ष यात्रेत येत नाहीत. त्याचा किती विसंवाद आहे ते दिसून येत आहे, असं म्हणत अमोल मिटकरी Amol Mitkari यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला आहे.
मी पवार घराण्याच्या वादात पडण्याचं काही काम नाही. पण मी अजित पवार यांच्यावर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे. श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद हे काय उमटले आहेत ते तुम्हाला पण माहित आहे, असंही अमोल मिटकरी म्हणाले.
रोहित पवार यांनी केली होती टीका
आदरणीय पवार साहेबांचं नाव न वापरण्याचं हमीपत्र देण्याचे आणि पक्ष व घड्याळ चिन्हाचा विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने ते तात्पुरतं असल्याची जाहीरात देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने फुटीर ‘अजितदादा मित्र मंडळा’ला दिल्याने या मंडळाची अवस्था आगीतून उठून फुपाट्यात पडल्यासारखी झालीय. एकतर भाजप वापरुन घेतंय आणि आता न्यायालयीन निकालाच्या अधिन राहून (अटी लागू) अशी अट खुद्द न्यायालयानेच घातल्याने या मंडळाच्या विश्वासार्हतेचा जाहीर पंचनामाच झालाय. आता या मंडळाला लोकसभेसाठी चार जागा तरी मिळतील की नाही, याची शंका आहेच पण विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत यांच्या हातात घड्याळही राहणार नाही आणि त्यातली वेळही बदलून बारा वाजलेले असतील, यात शंका नाही.
दुसरीकडं ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाला तुतारी चिन्हावरच लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका लढण्यास मान्यता देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय स्वागतार्ह असून याबाबत न्यायालयाचे आभार!