देश-विदेश

Modi Cabinet 2024 Live Updates: तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची देशभरातील शेतकऱ्यांना मोठी भेट, पहिल्याच दिवशी या फाईलवर केली सही

Modi Cabinet 2024 Live Updates: सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पीएम मोदींनी किसान सन्मान निधीचा हप्ता जारी करण्याच्या फाईलवर सही केल्यानंतर ते म्हणाले की, मी सतत काम करत आहोत.

ANI :- सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या एका दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी (10 जून), पीएम मोदींनी किसान सन्मान निधीचा हप्ता जारी करण्यासंदर्भातील फाइलवर स्वाक्षरी केली आहे. PM Modi Latest Update

फाइलवर सही केल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. आम्हालाशेतकऱ्यांच्या हितासाठी जास्तीत जास्त काम करायचे आहे. आमचे सरकार यावर सतत काम करत आहे आणि भविष्यातही ते करत राहील.याआधी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान मोदींनी देशातील करोडो शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी अंतर्गत 16 वा हप्ता जारी केला होता.

पीएम किसान सन्मान निधी योजना काय आहे?

पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रतिवर्षी 6,000 रुपयांची मदत दिली जाते. पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जातात. प्रत्येकी 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले जातात. या योजनेअंतर्गत दर चार महिन्यांनी एकदा पैसे पाठवले जातात. PM Modi Latest Update

Web Title : After becoming Prime Minister for the third time, Modi made a big visit to the farmers across the country, signed this file on the first day

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0