ACB Trap News : पोलीस विभागातून एक खळबळजनक बातमी ; 12 हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदाराला अटक

Jalna ACB Trao News : लाचलुचपत प्रतिबंधक जालना विभागाच्या पथकाने पोलीस हवालदाराला लाच स्वीकारताना रंगेहात पकडून अटक केली.
जालना :- जालना पोलीस Jalna Police Station विभागातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस हवालदाराला लाच स्वीकारताना Police Officer Taking Bribe In Jalna लाचलुचपत प्रतिबंधक जालना विभागाच्या पथकाने रंगेहात पकडून अटक केली ACB Arrested Bribe Officer आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाणे येथे पोलीस हवालदाराच्या विरोधातच तक्रार दाखल करण्यात आली आहे. अटक पोलीस हवालदाराचे नाव प्रताप रेवाजी चव्हाण (56 वर्ष) असे असून ते अंबड पोलीस ठाण्यात Ambad Police Station कार्यरत आहेत. Jalna ACB Latest News

नेमके काय घडले ?
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचे विरूद्ध अंबड पोलीस ठाणे (जि. जालना) येथे गुन्हा दाखल होता. त्या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार चव्हाण यांचेकडे होता. गुन्ह्यात तक्रारदार यांना मदत करण्यासाठी चव्हाण यांनी तक्रारदार यांचेकडे पंचासमक्ष 12 हजार रुपयांची लाचेची मागणी केली. Jalna ACB Latest News
चव्हाण यांना तक्रारदाराचे विरुद्ध दाखल गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी तक्रारदार यांचेकडून पंचासमक्ष सापळा रचून 12 हजारांची लाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लाचेची रक्कम जप्त करण्यात आली असून पोलीस हवालदार प्रताप रेवाजी चव्हाण यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध अंबड पोलीस ठाणे (ज़ि. जालना) येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. Jalna ACB Latest News

एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो छत्रपती संभाजीनगर,मुकुंद आघाव,अप्पर पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्युरो,छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी बी.एस जाधवर पोलीस उप अधीक्षक, सापळा पथक पोलीस अंमलदार गजानन घायवट, गणेश चेके,गणेश बुजाडे, शिवलिंग खुळे. विठ्ठल कापसे अँटी करप्शन ब्युरो ,जालना. यांनी कारवाई करत पोलीस हवालदाराला जेरबंद केले आहे.