ACB Trap : लाचखोर तलाठी अँटी करप्शन ब्युरो च्या जाळ्यात,1.20 लाखांची लाच स्वीकारताना तलाठी गजाआड
Bribe Talathi in the net of Anti-Corruption Bureau : लाचखोर तलाठी एसीबीच्या रडारवर, तलाठ्याचा डाव एसीबीने उधळला
छत्रपती संभाजीनगर :- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,छत्रपती संभाजीनगर Anti-Corruption Bureau Arrested Talathi For Bribe यांनी लाचखोर तलाठ्याचा डाव उधळाला असून लाचखोर तलाठी आणि एका खाजगी व्यक्तीला एसीबीने सापळा रचून ताब्यात घेतले आहे. ज्योती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सातारा छत्रपती संभाजीनगर Jyoti Builders & Developers Satara Chhatrapati Sambhajinagar यांच्या मॅनेजरकडे फेरफार संदर्भातील कामकरीता प्रत्येकी हजार रुपये असे 120 फेरफार असून तब्बल एक लाख वीस हजार रुपयाची लाच मागितली होती. या विरोधात एसीबी कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे मॅनेजरने लाचखोर तलाठी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. ACB Trap तलाठी याचे नाव दिलीप रामकृष्ण जाधव Talathi’s name is Dilip Ramakrishna Jadhav (55 वर्ष) सजा सातारा जिल्हा छत्रपती संभाजी नगर येथे तलाठी आहे. तर खाजगी व्यक्ती रवी मदन चव्हाण (31 वर्ष) असे असून यांना एसीबीने अटक केली आहे. Anti-Corruption Bureau Latest News
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार हे ज्योती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सातारा छत्रपती संभाजीनगर येथे मॅनेजर म्हणून कार्यरत असून ज्योती बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या प्लॉट/ घर खरेदी विक्रीचे प्रलंबित फेर नोंद व यापूर्वी केलेले 120 फेरचे प्रति फेर 1000 रुपये प्रमाणे एकूण 1.20 लाखांची रुपये लाचेची मागणी खाजगी इसम यांच्याकडून पंच साक्षीदार समक्ष करून तक्रारदार यांच्याकडून यापूर्वी 30 हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून उर्वरित 90 हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः पंच साक्षीदार समक्ष चेक करताना तलाठी दिलीप जाधव आणि खाजगी व्यक्ती रवी चव्हाण यांना ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस ठाणे सातारा छत्रपती संभाजीनगर येथे चालू आहे. Anti-Corruption Bureau Latest News
एसीबी पथक
संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि.छत्रपती संभाजीनगर.मुकुंद अघाव , अपर पोलिस अधीक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर सुरेश नाईकनवरे पोलीस उपाधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी संगीता पाटील पोलीस उप अधिक्षक ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर
सापळा पथक – पोलीस हवालदार राजेंद्र शिणकर, पोलीस अंमलदार विलास चव्हाण कारवाई केली आहे .