ठाणे

Thane Fraud News : ठाण्यात ‘Promissory Note’ घोटाळ्याने खळबळ! ‘एकदंत हाऊसिंग’च्या भागीदारांकडून 100 कोटींपेक्षा अधिकची फसवणूक

•व्याज देण्याचे आमिष दाखवून 200 हून अधिक गुंतवणूकदारांना गंडा; आरोपींच्या कार्यालयाची आणि घराची झडती

ठाणे :- ठाणे शहरात ‘मे. एकदंत हाऊसिंग’ (Ekdant Housing) नावाच्या संस्थेमार्फत गुंतवणूकदारांची 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची फसवणूक झाल्याचा गंभीर आर्थिक घोटाळा समोर आला आहे. नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर हा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

मे. एकदंत हाऊसिंगचे भागीदार हसमुख सुरजी शहा आणि अशोक विसनजी पासड यांनी गुंतवणुकीवर नियमित व्याज देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी गिरीश देडिया यांच्यासारख्या गुंतवणूकदारांना पैसे कर्जाऊ दिल्याबद्दल आरोपींकडून “Promissory Note” दिली जात होती. 2016 मध्ये फिर्यादीने 8 लाख रुपयांची गुंतवणूक केली आणि 2018 पर्यंत त्यांना 1.5 टक्के दराने नियमित व्याज मिळाले, पण त्यानंतर व्याज देणे बंद करण्यात आले.

आर्थिक परिस्थिती खराब असल्याचे सांगत आरोपींनी पैसे परत करण्यास नकार दिला. अधिक चौकशी केली असता, हसमुख शहा आणि अशोक पासड यांनी त्यांच्या संस्थेमार्फत इतर अंदाजे 200 गुंतवणूकदारांची एकत्रितपणे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची फसवणूक केल्याचे उघड झाले.

या घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, आर्थिक गुन्हे शाखेकडून तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे. 15 नोव्हेंबर 2025 रोजी ‘मे. एकदंत हाऊसिंग’चे कार्यालय आणि आरोपी हसमुख सुरजी शहा यांच्या ठाण्यातील निवासस्थानी झडती घेण्यात आली असून, गुन्ह्याशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे आणि हार्डडिस्क जप्त करण्यात आल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0