क्रीडा
Trending

अहमदाबादमध्ये भारताचा वेस्ट इंडिजवर ‘एक डाव’ दणदणीत विजय! जैस्वाल, जुरेल आणि जडेजाची शतकी कामगिरी

India Vs West Indies Live Score, 1st Test Day 3 : वेस्ट इंडिजचे फलंदाज चार सत्रेही खेळू शकले नाहीत; पहिल्या डावात 162, तर दुसऱ्या डावात केवळ 146 धावांवर गारद ; जडेजाचा अष्टपैलू पराक्रम: नाबाद 104 धावांसह दोन्ही डावांत 5 बळी

Ind won 1st test vs West Indies :- नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने वर्चस्व गाजवत वेस्ट इंडिजचा दारुण पराभव केला. भारताने हा सामना एक डाव आणि 140 धावांनी जिंकून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजचे फलंदाज या सामन्यात चार सत्रे देखील फलंदाजी करू शकले नाहीत, हे विशेष.

नाणेफेक फसली, वेस्ट इंडिज गडगडलेl

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा वेस्ट इंडिजचा निर्णय पूर्णपणे फसला. त्यांचा पहिला डाव केवळ 162 धावांवर आटोपला. वेस्ट इंडिजच्या एकाही फलंदाजाला अर्धशतकी खेळी करता आली नाही. भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 बळी घेतले, तर जसप्रीत बुमराहने 3, कुलदीप यादवने 2 आणि वॉशिंग्टन सुंदरने 1 गडी बाद केला.

भारताचा 448 धावांचा डोंगर

वेस्ट इंडिजचा पहिला डाव स्वस्तात गुंडाळल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने धावांचा डोंगर रचला. सलामीवीर यशस्वी जैस्वालने 36 धावांची खेळी केली, तर केएल राहुलने दमदार शतक झळकावले. कर्णधार शुभमन गिलनेही 50 धावांची अर्धशतकी खेळी केली.

मध्यक्रमात ध्रुव जुरेलने 125 धावांची अप्रतिम खेळी केली. त्याला रवींद्र जडेजाने नाबाद 104 धावा करून उत्तम साथ दिली. या दोघांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे भारतीय संघाने पहिला डाव 5 गडी बाद 448 धावांवर घोषित करत मोठी आघाडी घेतली.

दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांचा बोलबाला

पहिल्या डावात मोठी आघाडी मिळाल्यानंतर वेस्ट इंडिजकडून दुसऱ्या डावातही निराशाजनक कामगिरी झाली. त्यांचा डाव अवघ्या 146 धावांवर आटोपला. अथेंजने सर्वाधिक 38 धावांची खेळी केली.

भारताकडून दुसऱ्या डावात पुन्हा एकदा गोलंदाजांनी आपली ताकद दाखवली. रवींद्र जडेजाने सर्वाधिक 4 गडी बाद केले, तर मोहम्मद सिराजने 3, कुलदीप यादवने 2 आणि वॉशिंग्टन सुंदरने 1 गडी बाद केला. या एकतर्फी कामगिरीसह भारताने मोठ्या फरकाने विजय मिळवला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0