Vaishali Koli : आम आदमी पार्टीच्या वैशाली कोळी यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल

पावणेतीन कोटींची फसवणूक; खांदेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
पनवेल (जितीन शेट्टी) :- दोन कोटी ७४ लाख ८७ हजार रुपये घेऊन रक्कम परत न करता फसवणूक केल्याने वैशाली कोळी, संतोष कोळी, चैतन्य कोळी आणि कृष्णमिलन शुक्ला उर्फ बाबा शुक यांच्याविरोधात खांदेश्वर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैशाली कोळी आणि तिचे पती संतोष कोळी, त्यांचा मुलगा मुलगा चैतन्य कोळी, कृष्णमीलन शुक्ला उर्फ बाबा शुक्ला यांनी आपसात संगनमत करून खोटा एम.ओ.यू. करारनामा दाखवून कोपरखैरणे येथे जुनी बिल्डिंग विकत घेणार असल्याचे अश्विनी भोसले उर्फ अश्विनी मालगावकर यांना सांगितले. त्यामध्ये ५० टक्के नफा मिळवून देतो, असे सांगून ३० लाख ५७ हजारांची रक्कम आणि १९ लाख ४५ हजार ४७ रुपये ऑनलाइन व धनादेशाद्वारे घेतले. तातडीची अडचण आहे, असे सांगून अडीच लाखांचे दागिने घेऊन तेगहाण ठेवून अश्विनी यांच्याकडून ५२ लाख ५२ हजार रुपये घेऊन परत न करता त्यांची फसवणूक केली. त्यांच्या नावाने खोटा करारनामा करून व त्यावर त्यांची बनावट सही केली आहे. ओळखीची महिला सोनल वारदे त्यांच्याकडूनही रोखीने ६६ लाख ४२ हजार
आणि ऑनलाइन २९ लाख ७२ हजार एवढी रक्कम घेतली. यात एकूण ९६ लाख १५ हजार रक्कम परत केली नाही. सविता शेंडे यांच्याकडूनही एक कोटी २६ लाख २० हजार एवढी रक्कम घेऊन चौघांनी अपहार केला.