Aaditya Thackeray Meet Ramesh Bais : आदित्य ठाकरे यांनी घेतली राज्यपालांची भेट..
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली
मुंबई :- राज्यात सीईटीच्या परीक्षा संदर्भात मोठा गोंधळ उडाला असून त्यासंदर्भात आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे जाऊन भेट घेतली आहे. सीईटी विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या विविध मागण्या संदर्भात ही भेट घेतली असल्याचे म्हटले जात आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत यापूर्वीच सीईटी परीक्षेत किती गैरसमज आहे. हे सांगितले होते. विद्यार्थ्यांवर होणारे अन्याय बाबत आणि परीक्षेतील गोंधळाबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली असून राज्यपाल यांनी निपक्ष चौकशीचे आदेश देण्याची मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील MH-CET परिक्षांमधील गोंधळाबद्दल प्रश्न उपस्थित केले.
विद्यार्थ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत.
1) फेरपरीक्षा नको पण पारदर्शकता हवी.
2) विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका हव्या आहेत.
3) विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स आणि टॉपर्स जाणून घ्यायचे आहेत, फक्त पर्सेंटाइल नाही.
- CET चा 1 पेपर 24 बॅचमध्ये घेण्यात आला.
- 1425 आक्षेप घेण्यात आले आणि प्रत्येक आक्षेपासाठी, CET सेल ₹1000 आकारते आहे.
- सीईटी सेलने पेपर्समध्ये 54 चुका मान्य केल्या आहेत.
- त्यातील काही प्रश्नांमध्ये तर “MCQ मधील कोणताही पर्याय बरोबर नव्हता” अशाही चुका होत्या.
- हे पेपर कोणी सेट केले?
- ह्या अनागोंदी कारभारासाठी आयुक्तांना निलंबित का करू नये?
- पर्सेंटाईल कसे ठरवले जाते?
- मार्क्स का सांगितले नाहीत आणि उत्तरपत्रिका खुल्या का केल्या नाहीत?
- कुठला पेपर सोपा आणि कुठला कठीण हे कोण ठरवतो?
विद्यार्थ्यांच्या भवितव्याबद्दल अनभिज्ञ आहे हे दिसतंच आहे, पण बहुधा त्यांना परीक्षा आयोजित करणाऱ्या एजन्सीमध्येच स्वारस्य आहे आणि ॲाब्जेक्शन्समधून पैसे कमवायचे आहेत. आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.